Shiv Sena : गोविंदा शिवसेनेत! शिंदेंना 'या' जागेसाठी उमेदवार सापडला? 

सौरभ वक्तानिया

Govinda Joined Shiv Sena : माजी खासदार आणि अभिनेता गोविंदाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

ADVERTISEMENT

अभिनेता गोविंदाचा शिवसेनेमध्ये प्रवेश.
एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत गोविंदाने शिवसेनेत केला प्रवेश.
Google CTA

बातम्या हायलाइट

point

अभिनेता गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश

point

शिंदेंकडून लोकसभा निवडणुकीत उतरवणार?

point

कीर्तिकर यांचे तिकीट कापण्याची शक्यता

Govinda joined shiv sena : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मुंबईतील एका मतदारसंघासाठी एका सेलिब्रिटीचा शोध सुरू असल्याच्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला. अभिनेता गोविंदा यांने वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिंदे कलाकाराला उमेदवार असल्याची चर्चा आहे. त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. (Actor Govinda Joined eknath Shinde's Shiv Sena)

मला मिळालेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडेल, असे गोविंदा यावेळी म्हणाला. तर एकनाथ शिंदे यांनी गोविंदाचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी शिंदे म्हणाले की, "गोविंदाजी मला म्हणाले की, मुंबई बदलतेय. त्यांना विकास हवा आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली जे काम सुरू आहे, ते पाहून ते शिवसेनेमध्ये आले आहेत."

"मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीसाठी त्यांना काम करायचं आहे. त्यांनी मला सांगितलं आहे की, त्यांच्या कुठल्याही अटी शर्थी नाहीत. त्यांनी मला सांगितलं की, वनवास होता. तो संपला आहे. आता राम मंदिरही बनलं आहे. आता सगळीकडे गोविंदा... गोविंदा आहे", असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. 

त्यांना तिकीट नकोय - शिंदे

गोविंदाला उमेदवारी देणार आहे का? असा प्रश्न ज्यावेळी विचारण्यात आला. त्यावर शिंदे म्हणाले की, "त्यांनी कोणतीही अट ठेवलेली नाही. त्यांना तिकीट नको आहे. त्यांना बळजबरी तिकीट देणार का? त्यांना फक्त फिल्म इंडस्ट्रीसाठी काम करायचे आहे", असे सांगत शिंदेंनी थेट उत्तर देणे टाळले.