दिल्लीत नवा डाव, अमित शाह गेले शरद पवारांच्या घरी, 'ही' भेट अन् बरंच काही!
भाजपचे गृहमंत्री अमित शाह हे शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी गेले. ज्यावरून आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अमित शाह पवारांच्या घरी

अमित शाह यांच्या भेटीमागे राजकीय कारण?

राजधानी दिल्लीतील राजकारणाने राजकीय वर्तुळात नवी चर्चा
नवी दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री हे आज (12 डिसेंबर) थेट राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. शरद पवार यांचा 85 वा वाढदिवस आहे. त्याचनिमित्ताने ही भेट घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, राजकीयदृष्ट्या विचार केल्यास ही भेट नक्कीच साधीसुधी नसल्याचं आता बोललं जातंय. (new strategy in delhi amit shah goes to sharad pawar house this meeting and much more going to in politics)
एकीकडे आज सकाळी अजित पवार यांनी सहकुटुंब आणि आपल्या पक्षातील इतर महत्त्वाच्या नेत्यांना सोबत घेऊन शरद पवारांची भेट घेतली होती. अशावेळी शरद पवार आणि अमित शाह यांच्या आजच्या भेटीला अधिक महत्त्व आलं आहे.
हे ही वाचा>> Devendra Fadnavis : ...म्हणून शिंदे दिल्लीला आले नाही, मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल बोलताना फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं
अमित शाह आणि शरद पवारांच्या भेटीमागे कोणतं राजकारण?
अमित शाह यांनी दुपारी 4 वाजेच्या सुमारास फोनवरून शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी त्यांनी प्रत्यक्ष भेटीसाठी पवारांची वेळही मागितली. ज्यानंतर त्यांनी 5 वाजेच्या सुमारास शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.
आता ही भेट फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी घेण्यात आली होती असं भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, राज्यातील एकूण राजकीय वातावरण पाहता ही भेट एवढी सहजासहजी नाही.