Ambadas Danve : 'शिवसेनेतील स्वातंत्र्य सोडून भाजपची गुलामी पत्करली, आता..', दानवेंनी 'या' खासदाराला डिवचलं
Ambadas Danve reaction on Hemant Patil : मातोश्रीवर सन्मान मिळत होता तो हेमंत पाटील यांना पचवता आला नाही. शिवसेनेतील स्वातंत्र्य सोडून भाजपची गुलामी पत्करली, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत, असा टोला दानवेंनी हेमंत पाटलांना लगावला आहे.
ADVERTISEMENT
Ambadas Danve reaction on Hemant Patil : लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 13 खासदारांपैकी आतापर्यंत 3 खासदारांच तिकीट कापलं आहे. हा आकडा आणखीण वाढण्याची शक्यता आहे. कारण अद्याप अनेक जागांचा तिढा कायम आहे. आजच शिंदेंनी हिंगोलीतून हेमंत पाटील आणि यवतमाळ वाशिममधून भावना गवळी यांचं तिकीट कापलं होतं. त्यामुळे या दोन खासदारांना मोठा धक्का बसला आहे. असे असतानाच आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदेंच्या खासदारांना डिवचलं आहे. (ambadas danve reaction on hemant patil bhavana gawali ticket cutting lok sabha hingoli yavatmal washim eknath shinde)
ADVERTISEMENT
हिंगोलीतून हेमंत पाटील लोकसभेसाठी इच्छुक होते. मात्र शिंदेंनी हेमंत पाटलांचे तिकीट कापून त्यांच्याजागी बाबुराव कदम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हाच मुद्दा पकडत अंबादास दानवे यांनी हेमंत पाटलांना डिवचलं आहे. मातोश्रीवर सन्मान मिळत होता तो हेमंत पाटील यांना पचवता आला नाही. शिवसेनेतील स्वातंत्र्य सोडून भाजपची गुलामी पत्करली, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत, असा टोला दानवेंनी हेमंत पाटलांना लगावला आहे.
तसेच जाहीर झालेली उमेदवारी केवळ भाजपचा दबाव म्हणून बदलावी लागावी, यापेक्षा मोठी नामुष्की काय असावी. असा दबाव उद्धव साहेबांवर टाकण्याची हिंमत कधीच कोणाची झाली नाही. आता कुठे जाणार तुम्ही गद्दारांनो? असा सवाल दानवेंनी शिंदेंच्या खासदारांना करत 'लोकसभा तर ट्रेलर आहे.. तुमचे दिल्लीश्वर विधानसभेत पूर्ण पिक्चर दाखवतील', असा चिमटा देखील काढला.
हे वाचलं का?
अंबादास दावनेंचे ट्विट जसंच्या तसं
शिवसेनेत, मातोश्रीवर सन्मान मिळत होता तो हेमंत पाटील यांना पचवता आला नाही. शिवसेनेतील स्वातंत्र्य सोडून भाजपची गुलामी पत्करली, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत. जाहीर झालेली उमेदवारी केवळ भाजपचा दबाव म्हणून बदलावी लागावी, यापेक्षा मोठी नामुष्की काय असावी. असा दबाव उद्धवसाहेबांवर टाकण्याची हिंमत कधीच कोणाची झाली नाही. आता कुठे जाणार तुम्ही गद्दारांनो? लोकसभा हा तर ट्रेलर आहे.. तुमचे दिल्लीश्वर विधानसभेत पूर्ण पिक्चर दाखवतील..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरी हिंगोली लोकसभा मतदार संघातून हेमंत पाटील यांचे तिकीट कापले असले तरी त्यांच्या घरात मात्र त्यांनी उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या जागेवर भावना गवळी यांचा पत्ता कट झाला आहे. भावना गवळी या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातल्या विद्यमान खासदार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT