Eknath Shinde : ''कोरोना काळात रोकड मोजणाऱ्यांनी मोदींना...', CM शिंदेंची ठाकरेंवर टीका
Cm Eknath Shinde Criticize Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाकरेंच्या शिवसेनेला नकली सेनेला म्हटलं होतं. यावर बोलताना शिंदे म्हणाले, सेना कुठली आहे? उठाबसा सेना? आमची शिवसेना बाळासाहेबांची आहे, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. काँग्रेस प्रणित शिवसेना नाही, असा चिमटा शिंदेंनी काढला.
ADVERTISEMENT
Cm Eknath Shinde Criticize Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला आहे. राज ठाकरेंच्या या निर्णयाचं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आहे. ''मोदी साहेबांचे नेतृत्व आणि विकास कामांना पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. मी त्यांचा अभिनंदन करतो, असे शिंदे म्हणाले आहेत. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर केली आहे. (cm eknath shinde criticize udhhav thackeray raj thackeray support narendra modi lok sabha election 2024 maharashtra politics)
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाकरेंच्या शिवसेनेला नकली सेनेला म्हटलं होतं. यावर बोलताना शिंदे म्हणाले, सेना कुठली आहे? उठाबसा सेना? आमची शिवसेना बाळासाहेबांची आहे, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. काँग्रेस प्रणित शिवसेना नाही, असे शिंदे म्हणाले.
हे ही वाचा : ''उद्धव सारखं मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी मोदींना...'', राज ठाकरे कडाडले!
तसेच बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्यांनी, सावरकरांचा अवमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये. तुम्ही मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेसाठी, स्वार्थासाठी, मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांचे विचार विकले. धनुष्यबाण गहाण ठेवला आणि आम्हाला शिवसेना वाचवण्यासाठी शिवसैनिकांचा खच्चीकरण थांबवण्यासाठी ही भूमिका घ्यावी लागली,असी टीका शिंदेंनी ठाकरेंवर केली.
हे वाचलं का?
शिंदे पुढे म्हणाले, ''मोदींवर आरोप करण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकारच नाही.. (मोदींना)भेकड म्हणणं योग्य नाही.. कोरोनाच्या काळात ते घरी बसले होते आणि मोदीनी देशातीलच नव्हे तर जगातील लोकांना मदत केली.. तेव्हा आरोप लावणारे घरी बसून कोणता शौर्य दाखवत होते.. जेव्हा कोरोनामध्ये लोक मरत होते.. तेव्हा हे घरी बसून रोकड...... त्यांना रोकड पक्षाचे अध्यक्ष म्हणावं का.. रोकड मोजणाऱ्यांनी मोदींना भेकड म्हणू नये.. असे टीकास्त्र शिंदेंनी ठाकरेंवर डागलं.
हे ही वाचा : महायुतीच्या 20 ते 17 जागा 'डेंजर झोन'मध्ये, 'मविआ' मारणार मुसंडी!
पंतप्रधानांनी महाराष्ट्रात अनेक सभा दिल्या आहे. त्यांचा महाराष्ट्र वर प्रेम आहे. महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान आहे.. महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा निवडून येतील अशी गॅरंटी मतदारांनी मोदींना दिली आहे. 45 जागा जिंकून मोदींचे हात बळकट करू, असा विश्वास देखीस शिंदेंनी यावेळी व्यक्त केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT