Kangana Ranaut : बॉलिवूडची क्वीन लोकसभेच्या रिंगणात, BJP ने 'या' मतदारसंघातून दिलं तिकीट

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

कंगणा रणौत भाजपच्या तिकीटावर हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा निवडणूक लढवणार आहे
कंगणा रणौत भाजपच्या तिकीटावर हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा निवडणूक लढवणार आहे
social share
google news

Kangana Ranaut gets Ticket From BJP : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पाचवी यादी जाहीर केली आहे. या पाचव्या यादीत बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतला तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे आता कंगना रणौत (Kangana Ranaut) भाजपच्या तिकीटावर हिमाचल प्रदेशातील मंडी (mandi himachal pradesh) येथून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. कंगणासह टीव्हीचे सुपरहिट श्रीराम अरुण गोविल यांना देखील भाजपने उमेदवारी दिली असून ते मेरठ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.(  kangana ranaut contest lok sabha election bjp gets ticket from mandi himachal pradesh arun govil merath lok sabha seat) 

भाजपने रविवारी संध्याकाळी 111 लोकसभा मतदारसंघांसाठी आपले उमेदवार जाहीर केले.भाजपने बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौतला हिमाचल प्रदेशातील मंडी येथून खासदारकीची उमेदवारी दिली आहे.या यादीत उद्योगपती आणि काँग्रेसचे माजी खासदार नवीन जिंदाल यांचेही नाव आहे. विशेष म्हणजे त्यांनी अवघ्या तासाभरापूर्वी काँग्रेसचा राजीनामा देऊन पक्षात प्रवेश केला होता. नवीन जिंदाल यांना हरियाणाच्या कुरुक्षेत्र मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.त्याशिवाय टीव्हीचे राम अरुण गोविल यांनाही निवडणूक रिंगणात उतरवले आहे. पिलीभीतमधून वरुण गांधी यांना डावलून ही जागा काँग्रेसचे माजी नेते जितिन प्रसाद यांना देण्यात आली.

हे ही वाचा : Pratibha Dhanorkar : मुनगंटीवारांविरुद्ध काँग्रेसचा उमेदवार ठरला! शिवानी वडेट्टीवारांचा पत्ता कट

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कंगनाची पहिली प्रतिक्रिया 

भारत आणि भारतीय जनता पक्ष या दोघांवर माझं प्रेम आहे. मला भाजपाकडून कायमचा पाठिंबा मिळाला आहे. आज भाजपने माझं नाव लोकसभेची उमेदवार म्हणून जाहीर केलं. माझं जन्मस्थळ असलेल्या हिमाचलच्या मंडी या ठिकाणाहून मला उमेदवारी देण्यात आली आहे. माझ्यासाठी हा खुप मोठा बहुमान. मी एक चांगली कार्यकर्ता होईन आणि लोकसेवेसाठी काम करेन या आशयाची पोस्ट कंगनाने केली आहे. 

दरम्यान कंगना रणौत बॉलिवूडमधली सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना तिने मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यानंतर तिचं ऑफिस तोडण्यात आलं होतं. या कारवाईनंतर तिने उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Raju Parwe : काँग्रेसला विदर्भात झटका, शिंदेंनी फोडला आमदार

महाराष्ट्रातील तीन नावे जाहीर 

भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील तीन जागांचा समावेश आहे. या यादीत सोलापूरातून राम सातपूते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भंडारा-गोंदीयातून सुनील मेंढे आणि गडचिरोली चिमूर मतरदार संघातून अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT