Pratibha Dhanorkar : मुनगंटीवारांविरुद्ध काँग्रेसचा उमेदवार ठरला! शिवानी वडेट्टीवारांचा पत्ता कट
Chandrapur Lok Sabha elections 2024 : दिल्लीत प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विजय वडेट्टीवार यांचेही नाव उमेदवार म्हणून चर्चेत होते. मात्र आता काँग्रेसच्या तिकीटावरून प्रतिभा धानोरकर चंद्रपुरची जागा लढणार आहेत.
ADVERTISEMENT
Chandrapur Lok Sabha elections 2024 : भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्याविरुद्ध कोण? हा प्रश्न अखेर निकाली निघाला. शिवानी वडेट्टीवारांनी या मतदारसंघातून उमेदवारी मागितल्याने पेच निर्माण झाला होता, मात्र दिल्लीत प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विजय वडेट्टीवार यांचेही नाव उमेदवार म्हणून चर्चेत होते. मात्र आता काँग्रेसच्या तिकीटावरून प्रतिभा धानोरकर चंद्रपुरची जागा लढणार आहेत.(lok sabhe election 2024 pratibha dhanorkar name declare chandrapur lok sabha constituency shivani wadettiwar vijay wadettiwar)
ADVERTISEMENT
प्रतिभा धानोरकर या दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत. त्या वरोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. 2019 मध्ये बाळू धानोरकर या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती.
हे ही वाचा: Raju Parwe : काँग्रेसला विदर्भात झटका, शिंदेंनी फोडला आमदार
हे वाचलं का?
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी तयारी सुरु केली होती. त्यांनी या मतदारसंघातून तिकिटाची मागणीही केली होती. पण प्रतिभा धानोरकर यांनी आक्रमक भूमिका घेतली.
महायुतीच्या उमेदवाराविरोधात ताकद असलेल्या नेत्यांना उतरवण्यात येत आहे. काँग्रेसने तीन विद्यमान आमदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले असून, सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा होती. मात्र प्रतिभा धानोरकर उमेदवारीच्या बाबतीत सरस ठरल्या.
ADVERTISEMENT
हे ही वाचा: Lok Sabha 2024 : राणांना निवडणूक जाणार जड, बच्चू कडू उतरवणार 'भिडू'!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT