Kolhapur Lok Sabha : शाहू महाराज छत्रपतींकडे किती आहे संपत्ती?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

MVA Candidate Shahu Maharaj Chhatrapati : लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) ची रणधुमाळी सुरू झालेली आहे. जागावाटपही अंतिम टप्प्यात पोहोचलेलं आहे. यावेळी महाराष्ट्रातील राजकीय वारसा जपणाऱ्या दोन मतदार संघांची जोरदार चर्चा होत आहे. हे दोन मतदार संघ म्हणजे सातारा आणि कोल्हापूर. साताऱ्यात महायुतीकडून उदयनराजे भोसले यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर, त्यांच्या विरूद्ध मविआचे शशिकांत शिंदे ही निवडणूक लढत आहेत. तसंच, कोल्हापूरातून राजघराण्याचे वारसदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, महाविकास आघाडीकडून ही निवडणूक लढत आहेत. त्यांच्याविरूद्ध महायुतीचे संजय मंडलिक निवडणुकीच्या या रिंगणात उतरले आहेत. (Kolhapur Lok Sabha How much wealth does Shahu Maharaj Chhatrapati have affidavit release)

उमेदवारी जाहीर होताच एकमेकांविरूद्ध रूसवे-फुगवे, नाराजी, टीका-टिप्पण्या सध्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. या सर्व राजकीय आरोप-प्रत्यारोपात एक आणखी चर्चा होतेय ती म्हणजे संपत्तीची... कोल्हापूरात दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता त्यांची संपत्ती पतिज्ञापत्राद्वारे (Affidavit) जाहीर करण्यात आली आहे. अशात आज आपण श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या एकूण संपत्ती विषयी सविस्तर जाणून घेऊयात.

करोडोंची जमीन, सोने-चांदी अन्... किती आहे शाहू महाराज छत्रपतींची संपत्ती?

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी 297 कोटी 38 लाख 08 हजार रूपये म्हणजे जवळपास 300 कोटींची संपत्ती असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे. तर त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावे 41 कोटी 06 लाखांची संपत्ती आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शाहू छत्रपतींची जंगम मालमत्ता 147 कोटी 64 लाख 49 हजार रुपये आहे. तर, स्थावर मालमत्ता 149 कोटी 73 लाख 59 हजारांची आहे. त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे यांच्या नावे 23.71 कोटींची स्थावर आणि 17.35 कोटींची जंगम मालमत्ता आहे. शाहू महाराजांच्या नावे असलेल्या शेतजमिनीची किंमत जवळपास 122 कोटी रुपये आहे. तर त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावे 41 कोटी 06 लाखांची संपत्ती आहे.

शाहू महाराज छत्रपतींच्या नावावर कर्ज किती?

शाहू महाराज छत्रपतींच्या नावावर कोणतेही कर्ज नाही आहे ही विशेष बाब आहे. त्यांच्याकडे असलेल्या वाहनांची किंमत सहा कोटी आहे. तर, पत्नी याज्ञसेनी यांच्या नावावर सात कोटी 52 लाख रूपयांची शेतजमीन आहे. तसंच, शाहूंच्या नावे असलेल्या 15.5 लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या न्यू पॅलेस राजवाड्याचं बाजार मूल्य 18.11 कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांच्याकडे 01 कोटी 56 लाखांचे सोन्याचे, तर 55 लाखांचे चांदीचे दागिने आहेत.
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT