Maharashtra Opinion Poll 2024 : अजित पवारांना मोठा झटका! NCP ला पोलमध्ये किती जागा?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती मिळू शकतात जागा?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र लोकसभा ओपिनियन पोल २०२४

point

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत झटका बसणार?

point

दोन ओपिनियन पोलचा कौल काय आहे?

Ajit Pawar NCP, Maharashtra Opinion Poll 2024 : शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देत भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांना बंड भोवण्याची शक्यता दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागू शकते, असा अंदाज 16 एप्रिल 2024 रोजी समोर आलेल्या दोन ओपिनियन पोलने व्यक्त केले आहेत. (Big Setback To Ajit Pawar's NCP in Lok Sabha Opinion poll)

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी असून, त्यापूर्वी म्हणजेच 16 एप्रिल रोजी समोर आलेल्या दोन ओपिनियन पोलने अजित पवारांची चिंता वाढवली आहे. एकीकडे सर्वस्व पणाला लावलेल्या बारामतीतच अजित पवारांना पराभवाला सामोरं जावे लागू शकते, असे ओपिनियन पोलचे अंदाज आहेत. 

दुसरीकडे राज्यातील इतर जागांवरील निकालही अजित पवारांच्या राष्ट्रवादीची निराशा वाढवू शकतात. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

टीव्ही 9 आणि एबीपी सी व्होटरने लोकसभा निवडणुकीचे ओपिनियन पोल प्रसिद्ध केले आहेत. या पोलमध्ये महायुतीची पिछेहाट होताना दिसत आहेत. महत्त्वाचं म्हणजे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अजित पवार गटाचे टेन्शन वाढवले आहे. 

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेला किती मिळू शकतात  जागा?

या दोन्ही ओपिनियन पोलनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला शून्य जागा मिळतील. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सहा जागा लढवू शकते. त्यात एकाही जागेवार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार नाही, असे अंदाज आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> महाराष्ट्रातील 48 मतदारसंघामध्ये कोण जिंकणार? बघा संपूर्ण यादी

या पोलच्या अंदाजानुसार सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे हे उमेदवार असलेले दोन्ही मतदारसंघही अजित पवारांना लोकसभा निवडणुकीत गमवावे लागू शकतात.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजपला मिळणार 'एवढ्या' जागा, पण MVA साठी धोक्याची घंटा?

टीव्ही 9 च्या ओपिनियन पोलमध्ये भाजपला 25 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 3 जागा मिळू शकतात, असे म्हटले आहे. पण, महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणुकीत खातेही उघडू शकणार नाही, असे म्हटले आहे. 

एबीपी सी व्होटरचे अंदाज काय?

लोकसभा निवडणुकीसंदर्भात एबीपी सी व्होटरच्या ओपिनियन पोलमध्ये भाजपला 21-22 जागा मिळू शकतात, असे म्हटले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही 9-10 जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे. पण, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळणार नाही, असे हा ओपिनियन पोल म्हणतो.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT