Maharashtra Opinion Poll: ठाकरेंना मोठा धक्का, मुंबई-कोकणात कोण जिंकणार? पाहा संपूर्ण यादी

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई-कोकणात  कोण जिंकणार? पाहा संपूर्ण यादी
मुंबई-कोकणात कोण जिंकणार? पाहा संपूर्ण यादी
social share
google news

Mumbai Opinion Poll: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) च्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला आता अवघे दोनच दिवस उरले आहेत. याच निवडणुकीच्या दृष्टीने एबीपी सी-व्होटरने एक सर्व्हे केला आहे. ज्यामध्ये भाजप आणि महायुतीला चांगलं यश मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचवेळी मुंबई आणि कोकणात देखील महायुतीची सरशी होत असल्याचं दिसून येत आहे. (lok sabha election 2024 maharashtra opinion poll big shock to uddhav thackeray shiv sena who will win in mumbai konkan see the full list)

सर्व्हेतील धक्कादायक बाब म्हणजे शिवसेनेला रायगड वगळता एकाही जागी आघाडी मिळत नसल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 2014 आणि 2019 या निवडणुकीत शिवसेनेने मुंबईतील 3 जागा जिंकल्या होत्या. मात्र, आता सर्व्हेनुसार मुंबईतील एकाही जागी ठाकरेंच्या शिवसेनेला आघाडी मिळत नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेला कोकण आणि मुंबईत एकूण 5 जागा मिळू शकतील असं सर्व्हेत म्हटलं आहे. त्याप्रमाणेच भाजपला देखील 5 जागा मिळतील असंही सर्व्हेत नमूद करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सर्व्हेनुसार मुंबई-कोकणात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील?

  1. भाजप - 5 जागा
  2. शिवसेना (शिंदे गट) - 5 जागा
  3. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 1 जागा 
  4. शिवसेना (ठाकरे गट) - 1 जागा
  5. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 0 जागा 
  6. काँग्रेस - 0 जागा

Opinion Poll: मुंबई-कोकणातील मतदारसंघांमध्ये नेमका कोणता उमेदवार जिंकणार? 

1. पालघर (सोपा विजय)
भारत कामडी - शिवसेना (ठाकरे गट) - पिछाडीवर
महायुती उमेदवार जाहीर नाही -  (महायुतीचा उमेदवार आघाडी घेऊ शकतो)

2. भिवंडी (चुरशीची लढत)
कपिल पाटील - भाजप - पिछाडीवर
सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे - राष्ट्रवादी (शरद पवार) - आघाडीवर

ADVERTISEMENT

3. कल्याण (सोपा विजय)
श्रीकांत शिंदे -  शिवेसना (शिंदे गट) - आघाडीवर
वैशाली दरेकर - शिवसेना (ठाकरे गट) - पिछाडीवर

ADVERTISEMENT

4. ठाणे (चुरशीची लढत)
राजन विचारे - शिवसेना (ठाकरे गट) - पिछाडीवर
महायुती उमेदवार जाहीर नाही -  (महायुतीचा उमेदवार आघाडी घेऊ शकतो)

हे ही वाचा>> महाराष्ट्र: 48 मतदारसंघामध्ये कोण जिंकणार? संपूर्ण यादी

5. उत्तर मुंबई (सोपा विजय)
पियूष गोयल - भाजप - आघाडीवर
महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर नाही - पिछाडीवर

6. उत्तर-पश्चिम मुंबई (सोपा विजय)
अमोल किर्तीकर - शिवसेना (ठाकरे गट) - पिछाडीवर
महायुती उमेदवार जाहीर नाही -  (महायुतीचा उमेदवार आघाडी घेऊ शकतो)

7. उत्तर-पूर्व (ईशान्य मुंबई) (चुरशीची लढत)
मिहीर कोटेचा - भाजप - आघाडीवर
संजय दिना पाटील - शिवसेना (ठाकरे गट) - पिछाडीवर

8. उत्तर-मध्य मुंबई (सोपा विजय)
महायुती उमेदवार जाहीर नाही -  (महायुतीचा उमेदवार आघाडी घेऊ शकतो)
महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर नाही - पिछाडीवर

9. दक्षिण-मध्य मुंबई (सोपा विजय)
राहुल शेवाळे -  शिवसेना (ठाकरे गट) - आघाडीवर
अनिल देसाई -  शिवसेना (ठाकरे गट) - पिछाडीवर

हे ही वाचा>> Opinion Poll:पवार vs फडणवीस.. प. महाराष्ट्रात किंग कोण?

10. दक्षिण मुंबई (चुरशीची लढत)
अरविंद सावंत - शिवसेना (ठाकरे गट) - पिछाडीवर
महायुती उमेदवार जाहीर नाही -  (महायुतीचा उमेदवार आघाडी घेऊ शकतो)

11. रायगड (चुरशीची लढत)
सुनील तटकरे - राष्ट्रवादी (अजित पवार) - पिछाडीवर
अनंत गीते - शिवेसना (ठाकरे गट) - आघाडीवर

12. रत्नागिरी-सिंधुदुर्ग (सोपा विजय)
विनायक राऊत - शिवसेना (ठाकरे गट) - पिछाडीवर
महायुती उमेदवार जाहीर नाही -(महायुतीचा उमेदवार आघाडी घेऊ शकतो)

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT