बायकोचा बॉयफ्रेंडसोबतचा अश्लील फोटो गावभर व्हायरल झाला, नवऱ्याने काय केलं?
Bihar Crime News : एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध ठेवल्याच्या रागातून तरुणाची डोळे फोडून आणि गुप्तांग कापून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बायकोचा बॉयफ्रेंडसोबतचा अश्लील फोटो गावभर व्हायरल झाला
नवऱ्याने काय केलं?
Bihar Crime News : बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी येथून क्रूर हत्येची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. हरसिध्दी भागातील मठलोहियर गावात एका तरुणाला विवाहित महिलेशी प्रेमसंबंध ठेवणे जीवावर बेतले आहे. अजय पटेल (वय 25) असे या मृत तरुणाचे नाव आहे. अजयचे गावातीलच तब्बू नावाच्या विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. या संबंधांची माहिती महिलेचा पती असलम मियां याला मिळताच त्याने अजयचा काटा काढण्याचे ठरवले. असलमने केवळ अजयची हत्याच केली नाही, तर क्रूरपणे त्याचे डोळे फोडले आणि धारदार शस्त्राने त्याचे गुप्तांगही कापले. ही संपूर्ण क्रूर घटना अजयच्या प्रेयसीसमोरच घडली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा : वसई : सुट्टी असल्याने मुलं क्रिकेट खेळायला गेली, पण समोरचं भयंकर दृश्य पाहून पळत सुटली!
लुधियानाहून परतताच रचला सापळा; प्रेयसीनेच फोन करून बोलावले मृत्यूच्या दारात
अजय आणि तब्बू यांचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामुळे असलम चिडला होता. जीवाला धोका असल्याचे ओळखून अजय दोन महिन्यांपूर्वी पंजाबमधील लुधियाना येथे कामासाठी पळून गेला होता. मात्र, 6 तारखेला तो गावात परतल्याची माहिती मिळताच असलमने आपल्या पत्नीला सोबत घेऊन हत्येचा कट रचला. 8 तारखेच्या रात्री अजय एका कार्यक्रमावरून परतत असताना, प्रेयसी तब्बूने त्याला फोन करून भेटायला बोलावले. अजय तिथे पोहोचताच आधीच दबा धरून बसलेल्या असलम आणि त्याच्या साथीदारांनी त्याला पकडले. त्यांनी अजयला बेदम मारहाण केली आणि त्याच्या प्रेयसीच्या डोळ्यादेखत त्याची निर्घृण हत्या केली.
हेही वाचा : प्रेयसीच्या लग्नाला जाणं पडलं महागात, जीवाला मुकला तरुण; नेमकं काय घडलं?
हत्येला आत्महत्येचे रूप देण्याचा प्रयत्न; डॉग स्क्वॉडने 12 तासांत शोधले खुनी
हत्या केल्यानंतर हा प्रकार आत्महत्येचा वाटावा म्हणून आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अजयचा मृतदेह त्याच्याच घराच्या जवळील जनावरे बांधण्याच्या ठिकाणी नेला आणि तिथे दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत लटकवून दिला. सकाळी मृतदेह पाहून गावात खळबळ उडाली. मात्र, पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवली. पोलीस अधीक्षक आणि डीएसपींच्या सूचनेवरून डॉग स्क्वॉड आणि एफएसएल टीमला बोलावण्यात आले. खोजी कुत्रा घटनास्थळावरून थेट आरोपीच्या घरापर्यंत जाऊन थांबला, ज्यामुळे पोलिसांना मोठा पुरावा मिळाला. पोलिसांनी केवळ 12 तासांच्या आत या गुन्ह्याचा छडा लावत हत्येचे रहस्य उलगडले.









