बेरोजगारीमुळे घडले हत्याकांड, 23 वर्षीय नातवाने 70 वर्षीय आजीचा चिरला गळा

मुंबई तक

23 वर्षीय नातवाला त्याच्या 70 वर्षीय आजीने प्रेमाने नोकरी करण्याचा सल्ला दिला. मात्र यावरुन नातू भडकला आणि त्याने थेट आपल्या आजीची हत्याच केली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

बेरोजगारीमुळे घडले हत्याकांड

point

23 वर्षीय नातवाने 70 वर्षीय आजीचा चिरला गळा

Crime News : गुजरातमधील सुरतच्या पर्वत पाटिया भागात एका 23 वर्षीय तरुणाने आपल्या 70 वर्षीय आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बेरोजगारीवरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी गुरुवारी (7 मे) सांगितले. लीलाबेन चौधरी असे मृत महिलेचे नाव असून, पुणा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अनमोल कॉम्प्लेक्समधील तिसऱ्या मजल्यावरील त्यांच्या निवासस्थानी त्या मृतावस्थेत आढळल्या. 

पोलिसांची दिशाभूल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा नातू हर्ष पटेल याने घरगुती वादातून स्वयंपाकघरातील चाकूने त्यांच्यावर वार केले आणि गळा चिरून त्यांची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा हर्षने असा दावा केला की त्याच्या आजीने स्वतःला इजा करून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना रोखण्याच्या प्रयत्नात झालेल्या झटापटीत त्या गंभीर जखमी झाल्या. त्याने हाच बनाव शेजारी आणि नातेवाईकांसमोरही केला होता.

हे ही वाचा : उल्हासनगर : बहिणीने आनंदाने प्रेमविवाह केला, पण भावाच्या जातीच्या अहंगंडामुळे सूड उगवला

..म्हणून केली हत्या

मात्र, त्याच्या विधानातील विसंगती आणि घटनास्थळावरील पुराव्यांमुळे पोलिसांचा संशय बळावला. सखोल चौकशी दरम्यान हर्षने आपला गुन्हा कबूल केला, असे पोलिसांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, लीलाबेन या गेल्या दशकापासून हर्ष आणि त्याच्या बहिणीचा सांभाळ करत होत्या. त्याच्या आईने दुसरे लग्न करून दुसऱ्या भागात राहायला गेल्यापासून त्या या मुलांची काळजी घेत होत्या. हर्ष बऱ्याच काळापासून बेरोजगार होता आणि काम करत नसल्यामुळे किंवा जबाबदारी घेत नसल्यामुळे त्याची आजी त्याला वारंवार टोकू लागली होती.

हे ही वाचा : 'माझ्या बायकोवर वाईट नजर...' सख्ख्या भावांमध्ये रंगला रक्तरंजित थरार; पुढे काय घडलं?

नोकरी शोधण्याचा सल्ला दिला अन्..

घटनेच्या दिवशी घरातील इतर सदस्य घरी नव्हते. त्याची बहीण कामासाठी बाहेर गेली होती आणि त्याची पत्नी तिच्या माहेरी गेली होती. दुपारी 12 च्या सुमारास लीलाबेन यांनी हर्षला पुन्हा एकदा नोकरी शोधण्याचा सल्ला दिला असता त्यांच्यात वाद झाला. संतापलेल्या हर्षने रागाच्या भरात स्वयंपाकघरातील चाकू उचलला आणि त्यांच्यावर हल्ला केला. पोलीस उपायुक्त अजित सिंग परमार यांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त करण्यात आले आहे. हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक हादरले असून घरगुती वादाचे हिंसेत रूपांतर होण्याच्या धोक्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
 

हे वाचलं का?