'माझ्या बायकोवर वाईट नजर...' सख्ख्या भावांमध्ये रंगला रक्तरंजित थरार; पुढे काय घडलं?

मुंबई तक

बायकोवर वाईट नजर टाकल्याचा राग मनात धरून लहान भावाने आपल्या मोठ्या भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

माझ्या बायकोवर वाईट नजर...

point

सख्ख्या भावांमध्ये रंगला रक्तरंजित थरार

point

पुढे काय घडलं?

Crime News  : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बायकोवर वाईट नजर टाकल्याचा राग मनात धरून लहान भावाने आपल्या मोठ्या भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. चरथावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत 29 एप्रिल रोजी झुडपात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृताच्या हातावर 'दीपक' असे नाव गोंदलेले होते, त्यावरून त्याची ओळख रुकनपूर येथील रहिवासी दीपक म्हणून पटवण्यात पोलिसांना यश आले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

सीसीटीव्हीत काय दिसले?

या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील 28 एप्रिलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली की, घटनेच्या दिवशी दीपकने मोठ्या प्रमाणात मद्यपान केले होते आणि त्याचा लहान भाऊ सचिन याला तो दुचाकीवर बसवून घेऊन जात असल्याचे दिसले. मात्र, परत येताना सचिन दुचाकीवर एकटाच होता. या संशयावरून पोलिसांनी सचिनला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने आपल्या मोठ्या भावाची हत्या केल्याची कबुली दिली.

हे ही वाचा : Personal Finance: क्रेडिट कार्डच्या 'या' 5 चुका तुम्हाला बनवू शकतात कंगाल, आजच सुधारा नाहीतर...

वहिनीशी करायचा गैरवर्तन

आरोपी सचिनने पोलिसांना सांगितले की, दीपकला दारूचे व्यसन होते आणि तो अनेकदा मद्यधुंद अवस्थेत आपल्या वहिनीशी (सचिनच्या पत्नीशी) गैरवर्तन करून तिच्यावर वाईट नजर टाकायचा. इतकेच नाही तर दारूच्या खर्चासाठी तो घरातील जमीन विकण्याचाही प्रयत्न करत होता. मोठ्या भावाच्या या वागण्याला कंटाळून सचिनने त्याला बिरालसी कालव्याजवळ नेले आणि तिथे डोक्यात वीट घालून त्याची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याने मृतदेह जवळच्या झुडपात फेकून दिला आणि तिथून पळ काढला.

हे ही वाचा : अखेर थलपती विजय यांनी गेम पलटवला, 'त्या' पक्षाचा बिनशर्त पाठिंबा अन् मॅजिक फिगर गाठली!

बायकोनेही सोडून दिले

पोलीस अधीक्षक रवी शंकर मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपकचे लग्न झाले होते मात्र काही वर्षांपूर्वीच त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी सचिनला अटक केली आहे. तसेच, ज्या विटेने वार करून हत्या करण्यात आली, ती वीट देखील पोलिसांनी जप्त केली आहे. सध्या आरोपीची रवानगी तुरुंगात करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

हे वाचलं का?