अखेर थलपती विजय यांनी गेम पलटवला, 'त्या' पक्षाचा बिनशर्त पाठिंबा अन् मॅजिक फिगर गाठली!
Actor Politician Vijay : तामिळनाडूमध्ये व्हीसीके आणि आययुएमएलने बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यामुळे अभिनेता आणि राजकारणी विजय यांचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला असून ते लवकरच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अखेर थलपती विजय यांनी गेम पलटवला
'त्या' पक्षाचा बिनशर्त पाठिंबा अन् मॅजिक फिगर गाठली!
Actor Politician Vijay : तामिळनाडूच्या राजकारणात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मोठ्या सत्तासंघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला असून अभिनेता आणि राजकारणी विजय यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. शनिवारी व्हीसीके (VCK) आणि आययुएमएल (IUML) या दोन्ही पक्षांनी विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याने सत्तेचे समीकरण स्पष्ट झाले आहे. यापूर्वी सलग तीन दिवस राज्यपालांच्या भेटी घेऊनही विजय यांना बहुमतासाठी आवश्यक असलेला 118 आमदारांचा किमान आकडा सिद्ध करता आला नव्हता, त्यामुळे संपूर्ण तामिळनाडूमध्ये उत्कंठा शिगेला पोहोचली होती. मात्र, आता दोन-दोन जागा जिंकणाऱ्या व्हीसीके आणि आययुएमएलने साथ दिल्याने विजय यांच्याकडे बहुमतापेक्षा अधिक संख्याबळ जमा झाले आहे.
हेही वाचा : पीएम मोदी पाया पडले अन् आनंदाने मिठीही मारली, माखनलाल सरकार आहेत तरी कोण?
टीव्हीकेकडे सत्तेसाठी लागणाऱ्या जादूई आकड्यापेक्षा अधिक आमदारांचे बळ
दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या विजय यांच्या 'टीव्हीके' पक्षाने या निवडणुकीत डीएमके आणि एआयएडीएमके सारख्या प्रस्थापित पक्षांना मागे टाकत 108 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून झेप घेतली आहे. विजय यांनी स्वतः दोन जागांवर विजय मिळवला असला तरी, त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार असल्याने त्यांच्या पक्षाचे प्रभावी संख्याबळ 107 इतके धरले जात आहे. या राजकीय वाटाघाटींमध्ये सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी विजय यांना मित्रपक्षांचा पाठिंबा मिळवणे आवश्यक होते. गेल्या चार दिवसांतील तीव्र राजकीय घडामोडींनंतर आता टीव्हीकेकडे सत्तेसाठी लागणाऱ्या जादूई आकड्यापेक्षा अधिक आमदारांचे बळ मिळाले असून राज्यातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे.
हेही वाचा : 116, 117 की 118..., थलपती विजय यांना किती आमदारांचा पाठिंबा? राजभवनातील सूत्रांनी आकडा सांगितला
काँग्रेस आणि डाव्यांची आधीच मिळाली होती साथ; आता 120 आमदारांचे भक्कम पाठबळ
विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारला काँग्रेसने सर्वात आधी पाठिंबा दिला होता. दोन दशकांपासून असलेली डीएमकेची साथ सोडून काँग्रेसने आपल्या पाच आमदारांसह टीव्हीकेला साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शुक्रवारी चार आमदार असलेल्या डाव्या पक्षांनीही आपले समर्थन जाहीर केले होते. आता व्हीसीके आणि आययुएमएलच्या प्रत्येकी दोन आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने विजय यांच्या गटाचे एकूण संख्याबळ 120 वर पोहोचले आहे. या आकड्यांचे गणित पाहता टीव्हीकेचे 107, काँग्रेसचे 5, डाव्यांचे 4, व्हीसीकेचे 2 आणि आययुएमएलचे 2 असे एकूण 120 आमदार आता विजय यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे आपली संमती दर्शवणार आहेत.









