मिठी मारली, आशीर्वाद घेतले... बंगालमधील शपथविधीवेळी नरेंद्र मोदी कुणाच्या पाया पडले?
पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर भाजप सरकारचा भव्य शपथविधी सोहळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर पोहोचताच त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या एका वृद्ध व्यक्तीला प्रथम मिठी मारली, त्यानंतर त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मिठी मारली, आशीर्वाद घेतले...
बंगालमधील शपथविधीवेळी नरेंद्र मोदी कुणाच्या पाया पडले?
PM Modi in West Bengal : पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर भाजप सरकारचा भव्य शपथविधी सोहळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज मंचावर उपस्थित होते. दरम्यान, या सोहळ्यात एक अतिशय हृदयस्पर्शी घटना पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर पोहोचताच त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या एका वृद्ध व्यक्तीला प्रथम मिठी मारली, त्यानंतर त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले आणि बराच वेळ ते त्यांच्याशी आपुलकीने बोलत राहिले. यादरम्यान त्या वृद्धाचे डोळे पाणावले. हा प्रसंग तात्काळ चर्चेचा विषय बनला. शुभेंदु अधिकारी यांच्या शपथविधीच्या मंचावर पंतप्रधान मोदींनी नेमकी कोणाला मिठी मारली? असा प्रश्न विचारला जाऊ लागला.
मोदींनी कोणाचा घेतला आशीर्वाद?
आता समोर आले आहे की, पंतप्रधान मोदींनी मंचावर पश्चिम बंगालमधील भाजपच्या सर्वात ज्येष्ठ कार्यकर्त्यांपैकी एक असलेल्या माखनलाल सरकार यांचा आशीर्वाद घेतला आहे. 98 वर्षीय माखनलाल सरकार यांची गणना स्वातंत्र्यानंतर भारतात झालेल्या राष्ट्रवादी आंदोलनाशी जोडल्या गेलेल्या सुरुवातीच्या जमिनीवरील कार्यकर्त्यांमध्ये केली जाते.
1952 मध्ये ते श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासोबत काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनात सहभागी झाले होते. याच काळात त्यांना अटकही झाली होती. 1980 मध्ये भाजपच्या स्थापनेनंतर त्यांना पश्चिम दिनाजपूर, जलपाईगुडी आणि दार्जिलिंग जिल्ह्यांचे संघटन समन्वयक बनवण्यात आले. केवळ एका वर्षाच्या आत त्यांनी सुमारे 10 हजार नवीन सदस्यांना पक्षाशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
हे ही वाचा : 116, 117 की 118..., थलपती विजय यांना किती आमदारांचा पाठिंबा? राजभवनातील सूत्रांनी आकडा सांगितला
स्वातंत्र्यपूर्व काळापासून RSS सोबत
1981 पासून सलग सात वर्षे त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले. त्या काळात ही एक विलक्षण उपलब्धी मानली जाते, कारण सामान्यतः भाजप नेते कोणत्याही एका संघटनात्मक पदावर दोन वर्षांपेक्षा जास्त काळ राहत नसत. सिलिगुडीच्या डाग गावचे रहिवासी असलेले माखनलाल सरकार 1945 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले आहेत. त्यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासोबत काम केले असून बंगालमध्ये राष्ट्रवादी विचारधारा पुढे नेण्याच्या सुरुवातीच्या संघर्षांचे ते साक्षीदार राहिले आहेत. आज ज्या 'बंगाल निर्माणाची' चर्चा भाजप करत आहे, तेच स्वप्न माखनलाल सरकार यांनी दशकांपूर्वी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासोबत पाहिले होते.









