सांगली हादरली, दुहेरी हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराचा सुपारी देऊन खून; 24 तासात उलगडा

मुंबई तक

Sangli Crime News : सांगलीच्या जत येथील दुहेरी खून प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचे अपहरण करून कर्नाटकात नेऊन त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

 Sangli Crime News
Sangli Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

सांगली हादरली, दुहेरी हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराचा सुपारी देऊन खून

point

24 तासात कसा झाला उलगडा?

Sangli Crime News : सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील कोसारी गावामध्ये 2023 साली विहिरीतून गाळ काढण्याच्या वादातून विलास यमगर आणि प्रशांत यमगर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या गाजलेल्या डबल मर्डर प्रकरणाची सुनावणी सांगली येथील न्यायालयात सुरू असतानाच, या खटल्यातील मुख्य साक्षीदार दादासो नामदेव यमगर यांचा सुपारी देऊन काटा काढण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दादासो यमगर हे फिर्यादी प्रवीण यमगर यांच्यासोबत मोटारसायकलवरून सांगलीच्या दिशेने निघाले असताना कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाट्यावर त्यांचे अपहरण करण्यात आले होते. या घटनेमुळे सांगली पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारालाच संपवल्यामुळे गुन्हेगारांच्या मुजोरीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा : 116, 117 की 118..., थलपती विजय यांना किती आमदारांचा पाठिंबा? राजभवनातील सूत्रांनी आकडा सांगितला

अपहरण करून आत्महत्येचा बनाव; पोलिसांनी 12 तासांत लावला खुनाचा छडा

साक्षीदाराचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी गेल्या 24 तासांपासून दादासो यमगर यांचा कसून शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी त्यांना कर्नाटक राज्यातील अथणी तालुक्यात नेऊन त्यांची हत्या केली. हा खून नसून आत्महत्या आहे असा बनाव रचण्यासाठी आरोपींनी दादासो यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून दिला होता. मात्र, कवठेमहांकाळ पोलिसांनी तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या 12 तासांत या गुन्ह्याचा छडा लावला आणि हा घातपात असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा : बारावीच्या विद्यार्थ्याने दहावीतील विद्यार्थिनीचा चिरला गळा, का झाला लव्ह स्टोरीचा रक्तरंजित शेवट?

मुख्य सूत्रधारासह तिघांना ठोकल्या बेड्या

तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून, सध्या जेलमध्ये असलेल्या कोसारी दुहेरी खून प्रकरणातील संशयित आरोपींनीच बाहेरून सुपारी देऊन दादासो यमगर यांची हत्या घडवून आणल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या खून प्रकरणात मुख्य सूत्रधारासह ज्ञानू खोत, रोहित पाटोळे आणि हर्षद पैलवान या तिघांना अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत या आरोपींनी साक्षीदाराचे तोंड कायमचे बंद करण्यासाठीच हे पाऊल उचलल्याची कबुली दिली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या कारवाईची माहिती दिली असून, न्यायालयाने साक्ष नोंदवण्यापूर्वीच साक्षीदाराला संपवण्याच्या या गंभीर प्रकारामुळे पोलीस आता अधिक सखोल तपास करत आहेत.

दोन संशयित आरोपी अद्याप फरार; सांगली पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

हे वाचलं का?