'तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं', कथित कीर्तनकारांनी एकटे असताना गाठलं, विकास लवांडेंवर शाईफेक

मुंबई तक

Vikas Lawande Shaifek attacked by Sangram Bapu Bhandare : 'तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं', असं म्हणत कथित कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांच्यावर शाईच्या बाटल्या ओतल्या आहेत.

ADVERTISEMENT

Vikas Lawande Shaifek attacked by Sangram Bapu Bhandare
Vikas Lawande Shaifek attacked by Sangram Bapu Bhandare
google news

बातम्या हायलाइट

point

'तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं'

point

कथित कीर्तनकारांनी एकटे असताना गाठलं, विकास लवांडेंवर शाईफेक

Vikas Lawande Shaifek attacked by Sangram Bapu Bhandare, Pune : राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आळंदी येथे शाईफेक करण्यात आली आहे. विकास लवांडे आळंदी येथे प्रवचन देऊन परत येत होते. यावेळी कथित कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना अडवून एकटे असताना शाईफेक केली. शिवाय, काही गोरक्षकांनी पिस्तुल दाखवल्याचा आरोपही विकास लवांडे यांनी केलाय. हा प्रकार सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडला. 'तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं', असं म्हणत संग्राम भंडारे यांनी लवांडे यांच्यावर हा शाई हल्ला केला. 

हेही वाचा : अमित शाहांनी भाजपच्या आमदारांना दिली दोनदा संधी, पण शेवटी 'मुख्यमंत्री' म्हणून... वाचा Inside Story

विकास लवांडे म्हणाले, आज सकाळी आळंदी येथे माझं प्रवचन होतं. त्यानंतर पुण्याला जाण्यासाठी निघालेलो असताना वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही गोरक्षक आले. या सर्व गुंडांनी निर्जनस्थळी अडवलं होतं. माझ्यावर तीन बाटल्या शाई फेकली. दोघांनी रिव्हॉल्वर देखील होते. लोकं जमत असताना ते पळून गेले. मी त्याचा निषेध करतो. पोलिसांनी तात्काळ या सर्वांवर कारवाई करावी. जोपर्यंत त्यांना अटक तोपर्यंत लोणी-काळभोर पोलीस स्टेशनमध्ये माझा सत्याग्रह सुरु राहणार आहे. 

हेही वाचा : Personal Finance: जर तुमचा PAN लीक झाला, तर होईल प्रचंड नुकसान.. याल खूपच अडचणीत

पुढे बोलताना विकास लवांडे म्हणाले, सर्वांनी आत्ता लोणीकाळभोर पोलिस स्टेशनला यावे. वारकऱ्यातील नथुराम गोडसे अर्थात गुंड संग्राम भंडारे आणि काही  10/15 गुंड गोरक्षक यांनी तीन फोर व्हिलरमध्ये आले होते. आज माझे आळंदी मातोबाची तालुका हवेली येथे प्रवचन संपल्यानंतर आत्ता 10 वाजता मी परत असताना माझी गाडी अडवून माझ्या अंगावर शाही ओतली आणि मला धक्काबुक्की केली पिस्तूल दाखवला आहे. नंतर पळून गेले. त्या निषेधार्थ मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलो आहे . पुणे पोलीस आयुक्तांनी ताबडतोब त्या सर्व माझ्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त करावाmतोपर्यंत मी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे  सत्याग्रह करत आहे.

रोहित पवार यांची प्रतिक्रिया 

हे वाचलं का?