अमित शाहांनी भाजपच्या आमदारांना दिली दोनदा संधी, पण शेवटी 'मुख्यमंत्री' म्हणून... वाचा Inside Story
West Bengal Chief Minister: पश्चिम बंगालमध्ये भाजपचा आगामी मुख्यमंत्री कोण असणार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केलं. पण त्याआधी नेमकं काय घडलं याची इनसाइड स्टोरी नक्की जाणून घ्या.
ADVERTISEMENT

Amit Shah and BJP West Bengal CM: कोलकाता: पश्चिम बंगालच्या राजकारणात आज (8 मे) इतिहास घडला आहे. कोलकाता येथे झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला अंतिम स्वरूप देण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी स्वतः बंगालच्या मुख्यमंत्री पदी कोण असणार त्या नावाची घोषणा केली. अमित शाहा आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांच्या उपस्थितीत आमदारांनी एकमताने मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची निवड केली.
मुख्यमंत्री निवडण्यासाठी अमित शाहांनी दोन वेळेस दिली आमदारांना संधी
अमित शाहा यांनी बंगालच्या मुख्यमंत्री पदी कोणाचं नाव जाहीर केलं हे जाणून घेण्याआधी आपण या सगळ्या घडामोडीमधील एक इंटरेस्टिंग कहाणी आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
प. बंगालमध्ये अभूतपूर्व यश मिळविणाऱ्या भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत मागील काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरू होती. ज्यावरून अखेर आज पडदा हटला आहे. केंद्रीय गृहमंत्री यांचीच बंगालमध्ये पर्यवेक्षक म्हणून पक्षाने निवड केली होती. त्यामुळे सर्व नवनिर्वाचित आमदारांचं म्हणणं ऐकून त्यांना बंगालमधील मुख्यमंत्री पदी कोण असणार याची घोषणा करायची होती.
हे ही वाचा>> PM Modi: 'जिथे भाजप तिथे...', बंगालमध्ये 'कमळ' फुलताच PM मोदींनी दिली 'ती' गॅरंटी!
अखेर अमित शाह यांनी मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली हे जाहीर केलं. पण त्याआधी बोलताना अमित शाह यांनी एक गोष्ट स्पष्ट केली.









