मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या सुवेंदू अधिकारींच्या PA च्या डोक्यातच झाडल्या गोळ्या, जागीच मृत्यू
Suvendu Adhikari PA Murder: पं बंगालच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची अवघ्या काही वेळापूर्वीच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

कोलकाता/मध्यमग्राम: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर हिंसाचाराच्या घटना वाढल्या असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांचे वैयक्तिक सहायक (पीए) चंद्रनाथ रथ यांची मध्यग्राम येथे गोळीबार करून हत्या करण्यात आली. हल्ल्यात त्यांना तीन गोळ्या लागल्या.
कशी करण्यात आली सुवेंदू अधिकाऱ्याच्या PA ची हत्या
सूत्रांच्या माहितीनुसार, चंद्रनाथ रथ हे आपल्या घराकडे जाण्यासाठी मध्यग्राम येथे आपल्या काळ्या स्कॉर्पिओ कारमध्ये बसले होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर अत्यंत जवळून गोळीबार केला. त्यांना एक गोळी डोक्यात दुसरी छातीमध्ये आणि तिसरी पायात लागली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हल्ला दोहरिया, मध्यग्राम येथे घडला. हल्लेखोर दुचाकीवरून आले होते आणि घटनास्थळावरून फरारी झाले. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली असून, मध्यग्राम आणि कोलकाता परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही आणि प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
हे ही वाचा>> 'ते' एक स्वप्न अन् 'या बड्या नेत्यांचा' राजकारणात गेम ओव्हर! असं नेमकं काय घडलं?
राजकीय पार्श्वभूमी
ही हत्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकी नंतरच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर घडली आहे. निवडणूक निकालानंतर राज्यात हिंसाचार वाढला असल्याचे दिसत आहे. भाजपने ९ मे रोजी शपथ ग्रहण समारंभाचे आयोजन केले असून, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नितिन गडकरी आणि जे.पी. नड्डा यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.










