पुणे : 'टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो', वॉचमॅन 4 चिमुकल्या मुलींना 7 व्या मजल्यावर घेऊन गेला; अन्...
Pune Crime News : पुण्यातील हाउसिंग सोसायटीत वॉचमनने चार अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केला. पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेनंतर भोसरी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक करून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुणे : 'टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो',
वॉचमॅन 4 चिमुकल्या मुलींना 7 व्या मजल्यावर घेऊन गेला; अन्...
Pune Crime News : पुण्यातील एका हाउसिंग सोसायटीतून माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आलीये. ज्या वॉचमनच्या खांद्यावर संपूर्ण सोसायटीच्या सुरक्षेची जबाबदारी होती, त्यानेच चार निरागस मुलींना आपल्या वासनेचे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला गजाआड केले आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान घडली.
मुलींना इमारतीच्या सातव्या मजल्यावर घेऊन गेला अन्...
अधिकची माहिती अशी की, आरोपीचे नाव दिनेश चौधरी असून तो सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झाला होता आणि त्याचा कामाचा पहिलाच दिवस होता. आरोपीने 6, 8, 8 आणि 10 वर्षांच्या चार मुलींना फसवले. 'टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो' असे आमिष दाखवून तो मुलींना इमारतीच्या सातव्या मजल्यावर घेऊन गेला. वर नेल्यानंतर आरोपीने या निरागस मुलींसोबत अश्लील चाळे केले आणि त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा : कानात स्क्रू ड्रायव्हर, डोळे काढले आणि हात पाय छाटले; नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला संपवल्याचा आरोप
10 वर्षांच्या मुलीने धीर सोडला नाही, आईला सांगितलं
दरम्यान, आरोपी तिथेच थांबला नाही. त्याने मुलींना धमकी दिली की, "जर ही गोष्ट कोणाला सांगितली तर जीवे मारीन." आरोपीच्या धमकीमुळे घाबरलेल्या मुली घरी परतल्या. मात्र, त्यातील 10 वर्षांच्या मुलीने धीर सोडला नाही आणि तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. पालकांना ही घृणास्पद घटना कळताच त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठले.
भोसरी एमआयडीसी पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कारवाई केली. आरोपी दिनेश चौधरीविरोधात पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे रहिवासी भागातील मुलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.









