उल्हासनगर : बहिणीने आनंदाने प्रेमविवाह केला, पण भावाच्या जातीच्या अहंगंडामुळे सूड उगवला

मिथिलेश गुप्ता

Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये आंतरजातीय विवाहाचा राग मनात धरून मेहुण्याने आपल्या सख्ख्या भावजीवर भरदिवसा पेट्रोल पंपावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

Ulhasnagar Crime
Ulhasnagar Crime
google news

बातम्या हायलाइट

point

उल्हासनगर : बहिणीने आनंदाने प्रेमविवाह केला,

point

पण भावाच्या जातीच्या अहंगंडामुळे भयंकर घडलं!

Ulhasnagar Crime : उल्हासनगरमधून माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीने आपल्या पसंतीने केलेल्या आंतरजातीय विवाहाचा राग मनात धरून सख्ख्या भावाने आपल्या भावजीवर भरदिवसा जीवघेणा हल्ला केला. ही संतापजनक घटना उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 5 परिसरातील एका पेट्रोल पंपावर घडली, जिथे नागेश चव्हाण हा तरुण आपली दैनंदिन ड्युटी संपवून घरी जाण्याच्या तयारीत होता. नागेशवर अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, भररस्त्यात घडलेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणातील आरोपी शकील खान आणि त्याचा साथीदार अरबाज खान यांना पोलिसांनी अटक केलीये. जातीय अहंकारातून आलेला द्वेष पाहून पोलीस प्रशासनही चक्रावून गेले असून या हल्ल्याची भीषणता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हेही वाचा : 'विजय सरकार'चा शपथविधी, 29 वर्षीय किर्तनासह 9 आमदार होणार मंत्री; एक डॉक्टर तर 3 जण पोस्ट ग्रॅज्युएट

पेट्रोल पंपावर गाठले आणि पोटात खुपसला चाकू; मेहुण्याने घेतला सूड

नागेश चव्हाण हा नेहमीप्रमाणे पेट्रोल पंपावर आपले काम संपवून घरी निघत असतानाच, मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी त्याला घेरले. आरोपी शकील खान आणि त्याचा साथीदार अरबाज खान यांनी अत्यंत नियोजनबद्धरीत्या हा हल्ला चढवला. शकील खानने आपल्या कमरेला लावलेला धारदार चाकू बाहेर काढला आणि कोणत्याही वादाविना थेट नागेशच्या पोटात सपासप वार करण्यास सुरुवात केली. नागेशला स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही आणि तो काही क्षणांतच रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. उपस्थित नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत हा थरार घडला, ज्यामध्ये नागेश गंभीर जखमी झाला.

हेही वाचा : 'माझ्या बायकोवर वाईट नजर...' सख्ख्या भावांमध्ये रंगला रक्तरंजित थरार; पुढे काय घडलं?

 हिललाईन पोलिसांची वेगवान कारवाई; काही तासांतच दोन्ही आरोपींना बेड्या

घटनेनंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते, तर गंभीर जखमी नागेशला तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी मुंबईला रेफर केले आहे. या घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलिसांनी तपासाची चक्रे अत्यंत वेगाने फिरवली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा मागोवा घेतला. पोलिसांनी अवघ्या काही तासांतच मुख्य आरोपी शकील खान आणि त्याचा साथीदार अरबाज खान या दोघांनाही ताब्यात घेऊन अटक केली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे आरोपींना पळून जाण्याची संधी मिळाली नाही.

 आंतरजातीय विवाहाचा राग ठरला कारण; पोलिसांकडून पुढील तपास सुरू

हे वाचलं का?