'विजय सरकार'चा शपथविधी, 29 वर्षीय किर्तनासह 9 आमदार होणार मंत्री; एक डॉक्टर तर 3 जण पोस्ट ग्रॅज्युएट
Tamil Nadu CM Oath Ceremony : 'टीव्हीके' पक्षाचे प्रमुख थलपती विजय आज (दि.10 मे) सकाळी 10 वाजता चेन्नई येथील नेहरू स्टेडियमवर राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'विजय सरकार'चा शपथविधी
29 वर्षीय किर्तनासह 9 आमदार होणार मंत्री
एक डॉक्टर तर 3 जण पोस्ट ग्रॅज्युएट
Tamil Nadu CM Oath Ceremony : तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर रंगलेला बहुमताचा पेच अखेर संपला असून, तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाचे प्रमुख थलपती विजय आज (दि.10 मे) राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. चेन्नई येथील नेहरू स्टेडियमवर सकाळी 10 वाजता हा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे, विजय यांनी आधी दुपारी 3:45 वाजता शपथ घेण्याचे ठरवले होते, परंतु त्यांच्या ज्योतिषाने दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी सकाळी 10 वाजताची वेळ निश्चित केली आहे. 9 मे रोजी विजय यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र दिलं, त्यानंतर राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले. विजय यांना 13 मे 2026 रोजी किंवा त्यापूर्वी विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. या ऐतिहासिक क्षणाबद्दल विजय यांचे वडील आणि प्रसिद्ध दिग्दर्शक एस.ए. चंद्रशेखर यांनी प्रचंड आनंद व्यक्त करत, हा तामिळ जनतेचा विजय असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पुन्हा दुहेरी संकट, कुठे ऊन तर कुठे पाऊस; 14 जिल्ह्यांचं अवघड होणार
राहुल गांधींची उपस्थिती आणि स्टालिन यांना निमंत्रण; भव्य सोहळ्याची तयारी
या शपथविधी सोहळ्याला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सकाळीच दिल्लीहून चेन्नईकडे रवाना झाले आहेत. शिष्टाचारानुसार, राज्याचे मावळते मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. विजय यांच्या या शपथविधीमुळे तामिळनाडूच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात मानली जात आहे. तामिळनाडूच्या जनतेसाठी हा 'मोठा दिवस' आहे, असं शिवकाशीच्या नवनिर्वाचित आमदार एस. कीर्तना म्हणाल्या. संपूर्ण राज्य या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे सांगितले आहे. तसेच व्हीसीकेचे अध्यक्ष थोल थिरुमावलवन यांनीही सोशल मीडियावरून विजय यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा : अखेर थलपती विजय यांनी गेम पलटवला, 'त्या' पक्षाचा बिनशर्त पाठिंबा अन् मॅजिक फिगर गाठली!









