Maharashtra Weather : राज्यात पुन्हा दुहेरी संकट, कुठे ऊन तर कुठे पाऊस; 14 जिल्ह्यांचं अवघड होणार
Maharashtra Weather : राज्यात पुन्हा एकदा दुहेरी हवामानाने डोकं वर काढलं आहे. काही भागांमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अधिकचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागानुसार, 10 मे 2026 रोजी राज्यातील 5 जिल्ह्यांसाठी उष्णतेचा आणि 9 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात पुन्हा हवामानाचे दुहेरी संकट
काही भागांमध्ये उष्णतेची लाट
तर कुठे पाऊस
Maharashtra Weather : राज्यात पुन्हा एकदा दुहेरी हवामानाच्या संकटाने डोकं वर काढलं आहे. काही भागांमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अधिकचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागानुसार, 10 मे 2026 रोजी राज्यातील 5 जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला, तसेच 9 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. एकाच वेळी उकाडा आणि काही ठिकाणी अवकाळी पावसाची स्थिती निर्माण होण्याची अधिक शक्यतेचा अंदाज वर्तवण्यात आला.
हे ही वाचा : पीएम मोदी पाया पडले अन् आनंदाने मिठीही मारली, माखनलाल सरकार आहेत तरी कोण?
कोकण
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेचा अधिकचा प्रभाव आहे. दुपारी तापमान अधिक वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उन्हामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हवामान उष्ण आणि कोरडं राहील अशी शक्यता आहे. तसेच या तीन जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची कसलीही शक्यता नाही.
मराठवाडा
मराठवाडा विभागातील लातूर, धाराशिव आणि नांदेड या तीन जिल्ह्यांत उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. या भागांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तसेच ठिकठिकाणी विजांच्या गडगडाटासह वाऱ्याचा वेग वाढेल अशी शक्यता वर्तवली आहे.









