प्रेयसीच्या लग्नाला जाणं पडलं महागात, जीवाला मुकला तरुण; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

एका 23 वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळल्याने खळबळ उडाली होती. सुरुवातीला ही घटना अपघाताची वाटत असली, तरी पोलिसांनी कसून तपास केल्यावर एका धक्कादायक प्रेम प्रकरणाचा आणि क्रूर हत्येचा खुलासा झाला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

प्रेयसीच्या लग्नाला जाणं पडलं महागात

point

जीवाला मुकला तरुण

point

नेमकं काय घडलं?

Crime News : मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात 23 वर्षीय तरुण नगपुरे या तरुणाचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळल्याने खळबळ उडाली होती. सुरुवातीला ही घटना अपघाताची वाटत असली, तरी पोलिसांनी कसून तपास केल्यावर एका धक्कादायक प्रेम प्रकरणाचा आणि क्रूर हत्येचा खुलासा झाला आहे. तरुणचे गावातीलच एका मुलीसोबत गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते आणि दोघांनाही लग्न करायचे होते. मात्र, कुटुंबीयांच्या विरोधामुळे मुलीचे लग्न 5 मे रोजी दुसऱ्या ठिकाणी ठरले होते. आपल्या प्रेयसीला शेवटचे नववधूच्या रूपात पाहण्यासाठी तरुण लग्नाच्या दिवशी तिथे पोहोचला होता, हीच त्याची मोठी चूक ठरली.

बहिणीच्या प्रियकराला पाहताच राग झाला अनावर

लग्नाच्या दिवशी तरुणीनेच तरुणला इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप कॉल करून बोलावले होते. पोलीस तपासात लग्नाच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये तरुण चालताना दिसून आला, ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. तरुणीचा भाऊ वेद प्रकाश याने जेव्हा तरुणला लग्नमंडपात पाहिले, तेव्हा त्याचा राग अनावर झाला. त्याने आपला भाऊ हरिप्रकाश आणि मित्र योगेश, कमल किशोर व दिलीप यांच्या मदतीने तरुणला घेरले. या सर्वांनी तरुणला स्टेजच्या मागे नेऊन लाठी-काठ्यांनी इतकी अमानुष मारहाण केली की, त्याचा जागीच मृत्यू झाला.

हे ही वाचा : बॉयफ्रेंडच्या प्रेमात आंधळी झाली, थेट कुटुंबायांना सोडून गेली.., पण शेवटी सगळं संपलं!

गुन्हेगारी चित्रपटाप्रमाणे रचला कट

तरुणची हत्या केल्यानंतर आरोपींनी ही घटना अपघातासारखी भासवण्यासाठी एखाद्या गुन्हेगारी चित्रपटाप्रमाणे कट रचला. आरोपींनी तरुणचा मृतदेह त्याच्याच दुचाकीवर मध्ये बसवला आणि ते त्याला घटनास्थळावरून लांब घेऊन गेले. हा अपघात खरा वाटावा यासाठी चालत्या दुचाकीवरून तरुणचे पाय रस्त्यावर घासले गेले, जेणेकरून शरीरावर फरफटल्याच्या खुणा निर्माण होतील. शेवटी एके ठिकाणी मृतदेह आणि दुचाकी फेकून देऊन आरोपींनी पळ काढला. मात्र, पोलिसांच्या नजरेतून हा बनाव सुटू शकला नाही.

हे ही वाचा : बिझनेसमन, मुलगा अन् मुलगी... सिमेंट फॅक्टरीत सापडले तीन मृतदेह; नेमकं काय घडलं?

लग्नाचा सोहळा ठरला जीवघेणा

पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि कॉल डिटेल्सच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ज्या प्रेमासाठी तरुणने आपले सर्वस्व पणाला लावले होते, त्याच प्रेमाच्या ओढीने त्याला मृत्यूच्या दारात नेऊन सोडले. आपल्या प्रेयसीच्या आठवणीत डोक्याचे मुंडन केलेल्या तरुणला याची कल्पनाही नसेल की, तिच्या लग्नाचा सोहळा त्याच्या आयुष्याचा शेवटचा क्षण ठरेल. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या क्रूर कृत्याने समाजमन सुन्न झाले आहे.
 

हे वाचलं का?