लग्नाच्या वरातीत नवरदेवाला सुजेपर्यंत बडवला, आनंदाच्या दिवशी कार्यक्रमात रडारड, नेमकं काय घडलं?
CrIme News : जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारी एक खळबळजनक घटना घडली आहे. 7 मे रोजी सायंकाळी नवरदेव मुन्नीलाल लग्नाची वरात घेऊन जाताना, काही हल्लेखोरांनी गाडीचा ताफा थांबवून एकच गोंधळ उडवला. या संपूर्ण घटनेनं पोलीस परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नवरदेवावर काठ्यांनी निर्घृणपणे हल्ला केला
जुने वैर असल्याची शक्यता
CrIme News : उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारी एक खळबळजनक घटना घडली आहे. 7 मे रोजी सायंकाळी नवरदेव मुन्नीलाल लग्नाची वरात घेऊन जाताना, काही हल्लेखोरांनी गाडीचा ताफा थांबवून एकच गोंधळ उडवला. या संपूर्ण घटनेनं माझगुवा पोलीस परिसर हादरून गेला होता.
हे ही वाचा : पुणे : नवऱ्यासमोर बायकोची आठव्या मजल्यावरून उडी, थरकाप उडवणारा Video
नवरदेवावर काठ्यांनी निर्घृणपणे हल्ला केला
घडलेल्या घटनेनुसार, माझगुवा पोलीस परिसरात पोलिसांनी रस्ता अडवला, एखाद्या फिल्मी स्टाईलमध्ये समाजकंटकांनी लग्नाच्या मिरवणुकीची वाहने मध्येच थांबवली. नंतर गाडीच्या काचा फोडून हल्लेखोरांनी नवरदेव मुन्नीलाल याला बाहेर काढले आणि काठ्यांनी त्याच्यावर निर्घृणपणे हल्ला केला. या हल्ल्यात नवरदेव जबर जखमी झाला. या हल्ल्यादरम्यान नवरदेवाचा भाऊ आणि त्याला वाचवायला आलेल्या इतर नातेवाईकांनाही हल्लेखोरांनी सोडले नाही, ते देखील गंभीर जखमी झाले.
जुने वैर असल्याची शक्यता
प्राथमिक माहितीनुसार, या भीषण हल्ल्यात जुने वैर असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. जखमींना तात्काळपणे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मुन्नीलाल सध्या उपचार सुरू आहेत. लग्नाच्या पवित्र दिवशी झालेल्या हिंसाचाराने संपूर्ण परिसर हादरून गेला होता.
हे ही वाचा : पोलीस कोणी नसताना सहकाऱ्याच्या घरी जायचा, 8 वर्षांनी मोठं कांड, आईने सगळंच सांगितलं
पोलिसांनी दावा केला की, सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींच्या आधारे आरोपींची ओळख पटवली असून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात आली. परिसरात तणावजन्य परिस्थिती असून शांतता राखण्यासाठी पोलीस दल तैनात करण्यात आले. लग्नसमारंभात तोडफोडीच्या कृत्याने स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.









