दीराचे लग्न ठरल्याने भडकली, वहिनीने शेतात बोलावलं अन्..., पुढं काय घडलं?

मुंबई तक

एका महिलेने आपल्या दीराचे लग्न ठरल्याच्या रागातून त्याचे गुप्तांग ब्लेडने कापल्याची भयंकर घटना घडली आहे. या अनैतिक संबंधांचा असा रक्तरंजित शेवट पाहून सर्वच जण अवाक झाले आहेत.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

दीराचे लग्न ठरल्याने भडकली

point

वहिनीने शेतात बोलावलं अन्...

point

पुढं काय घडलं?

Crime News : उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने आपल्या दीराचे लग्न ठरल्याच्या रागातून त्याचे गुप्तांग ब्लेडने कापल्याची भयंकर घटना घडली आहे. या कृत्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनैतिक संबंधांचा असा रक्तरंजित शेवट पाहून सर्वच जण अवाक झाले आहेत. ही घटना पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुजदेई गावात घडली आहे.

दीराचे लग्न ठरल्याने संतापली

मिळालेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय सुधीरचे गेल्या चार वर्षांपासून आपल्या नात्यातील एका भावजयीसोबत प्रेमसंबंध होते. संबंधित महिला चार मुलांची आई आहे. सुधीरचे 6 मे रोजी दुसऱ्या मुलीशी लग्न झाले होते, ही बातमी समजताच त्याची विवाहित प्रेमिका सूडाच्या भावनेने पेटून उठली. सुधीरने आपल्याला धोका दिल्याचा समज करून घेत तिने त्याला धडा शिकवण्याचे ठरवले आणि शनिवारी (9 मे) बोलण्याच्या बहाण्याने गावाजवळील शेतात बोलावले.

हे ही वाचा : पोलीस कोणी नसताना सहकाऱ्याच्या घरी जायचा, 8 वर्षांनी मोठं कांड, आईने सगळंच सांगितलं

शेतात बोलावले अन्...

सुधीर शेतात पोहोचल्यानंतर दोघांमध्ये लग्नावरून जोरदार वादावादी झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, महिलेने अचानक जवळ असलेले ब्लेड काढून सुधीरच्या गुप्तांगावर वार केला. या हल्ल्यात सुधीर गंभीर जखमी होऊन वेदनेने तडफडू लागला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुधीरने आपला जीव वाचवण्यासाठी रस्त्याच्या दिशेने धाव घेतली, मात्र आरोपी महिला तिथेही त्याच्या पाठीमागे पोहोचली. रस्त्यावर दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली.

हे ही वाचा : बॉयफ्रेंडच्या प्रेमात आंधळी झाली, थेट कुटुंबियांना सोडून गेली.., पण शेवटी सगळं संपलं!

लोक जमा होताच काय घडलं?

लोकांनी आपल्याला घेरल्याचे पाहून महिलेने प्रसंगावधान राखत तात्काळ आपली गोष्ट बदलली. सुधीरने तिला बँकेत जात असताना अडवले आणि तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, असा कांगावा तिने लोकांसमोर केला. सध्या जखमी सुधीरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, हा प्रकार प्रेमप्रकरण आणि वैमनस्यातून घडल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत आहेत.
 

हे वाचलं का?