हॉटेलच्या खोलीत 23 वर्षीय तरुणासह 34 वर्षीय महिलेचा मृतदेह, महिनाभरच टिकलं प्रेम

मुंबई तक

crime news : झाशीच्या पोलिसांनी हॉटेल रॉयल इनच्या खोली क्रमांक 205 मधून दोन मृतदेह ताब्यात घेतले. या प्रकरणातील पुढील खुलाशांनी सर्वांनाच थक्क केले. या दोघांचे एकमेकांशी प्रेमसंबंध होते, पण ते प्रेम एकच महिने टिकले. 

ADVERTISEMENT

crime news
crime news
google news

बातम्या हायलाइट

point

वडील आणि काकांना आठवणींचा पूर

point

प्रियकर आणि प्रेयसीचा मृतदेह हॉटेलमध्ये 

Crime News : उत्तर प्रदेशात झाशीच्या पोलिसांनी हॉटेल रॉयल इनच्या खोली क्रमांक 205 मधून दोन मृतदेह ताब्यात घेतले. मृत पुरुषाचे नाव युवराज यादव (वय 23) आणि महिलेचं नाव भारती (वय 34) अशी दोघांची ओळख झाली. या प्रकरणातील पुढील खुलाशांनी सर्वांनाच थक्क केले. या दोघांचे एकमेकांशी प्रेमसंबंध होते, पण ते प्रेम एकच महिने टिकले. 

हे ही वाचा : गोड बोलून 900 किमी दूर बोलावलं, इन्स्टावाल्या लव्हस्टोरीचा शेवट कसा झाला?

वडील आणि काकांना आठवणींचा पूर

घडलेल्या घटनेनुसार, तो झाशीतील चिरगाव येथील औपारा गावातील रहिवासी होता. युवराजचे वडील आणि काकांनी सांगितले की, त्यांचा मुलगा एक हुशार विद्यार्थी होता. त्याने बीए चे शिक्षण पूर्ण केले होते आणि तो स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. मुलाच्या सततच्या येण्या-जाण्याने महिलेलाही घरी वारंवार यावे लागले होते. दरम्यान, त्यांचा मुलगा युवराज आणि ती महिला एकमेकांच्या प्रेमात कधी पडले याची त्यांना कल्पना नव्हती. 

प्रियकर आणि प्रेयसीचा मृतदेह हॉटेलमध्ये 

रविवारी त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळाली होती. त्यांचा मुलगा युवराज आणि प्रेयसी भारतचा मृतदेह हा हॉटेलच्या खोलीत आढळून आला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले, परंतु तेथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. युवराजच्या कुटुंबीयांनी  असा दावा केला की, भारती आणि युवराज यांनी विष प्राशन केले होते. 

हे ही वाचा : बीड : भोळसर मुलीवर चुलत भावाचा अत्याचार, बापाला अटक, डॉक्टरचा बीपी वाढला!

या प्रकरणी पोलीस सर्कल ऑफिसर लक्ष्मीकांत म्हणाले, 'हॉटेलच्या खोलीत तरुणाने आणि तरुणीने विष प्राशन केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांनाही उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत'.  

हे वाचलं का?