बांगलादेशी तरुणी इन्स्टाग्रामवरील प्रेमाला शोधत थेट जळगावात, विना व्हिसा भारतात केली घुसखोरी
Jalgoan crime : जळगाव शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इन्स्टाग्रामवरील प्रेमसंबंधातून बांगलादेशी तरुणी विनाविसा थेट जळगावात आली. कोणीका राणी शामलचंद्र राय असे संबंधित तरुणीचे नाव आहे, विनाविसा प्रवास केल्याने पोलिसांनी तरुणीला अटक केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जोशी पेठ परिसरात परदेशी महिला विनापरवाना राहत असल्याची गुप्त माहिती
पासपोर्ट किंवा व्हिसा नसताना महिलेची भारतात अवैधपणे घुसखोरी
Jalgoan Crime : मनीष जोग - जळगाव शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इन्स्टाग्रामवरील प्रेमसंबंधातून बांगलादेशी तरुणी विनाविसा थेट जळगावात आली. कोणीका राणी शामलचंद्र राय असे संबंधित तरुणीचे नाव आहे, विनाविसा प्रवास केल्याने पोलिसांनी तरुणीला अटक केली. तसेच सोने कारागीर चिन्मय जगन्नाथ यांच्यासोबत त्या तरुणीची ओळख झाल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी शनिपेठ पोलिसांनी कारवाई करत आश्रय देणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा : धाकट्या भावाच्या पत्नीवर वाईट नजर ठेवल्याने थोरल्या भावाची विटेने हत्या, मृतदेह झुडपात दिला फेकून
जोशी पेठ परिसरात परदेशी महिला विनापरवाना राहत असल्याची गुप्त माहिती
पोलिसांनी भोई गल्ली, जोशी पेठ परिसरात एका परदेशी महिला विनापरवाना राहत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यातच आला होता. त्याचदरम्यान कोणीका राणी शामलचंद्र राय (वय 20) ही महिला आढळून आली होती. एकमेकांची आधी ओळख झाली, नंतर ओळखीचे प्रेमसंबंधात रुपांतर झाले.
पासपोर्ट किंवा व्हिसा नसताना महिलेची भारतात अवैधपणे घुसखोरी
तपासातून ती कोणतेही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसताना अवैधपणे तिने भारतात घुसखोरी केली. या प्रकरणी पोलिसांनी कोणीका राणी आणि चिन्मयवाला यांच्याविरुद्ध इमिग्रेशन व परदेशी कायदा 2025 अंतर्गत गुन्हा दाखल करून बांगलादेशी तरुणीला अटक केली.
हे ही वाचा : हॉटेलच्या खोलीत 23 वर्षीय तरुणासह 34 वर्षीय महिलेचा मृतदेह, महिनाभरच टिकलं प्रेम
दरम्यान, कोणीका आणि चिन्मय यांनी लग्न केल्याची माहिती सांगितली. परंतु याबाबत त्यांच्याकडे कुठलाही पुरावा अद्याप समोर आलेला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.









