Lok Sabha Election 2024: Devendra फडणवीसांनी फॉर्म्युला फोडला, शिंदेंना किती आणि कोणत्या जागा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

जागा वाटपाबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
जागा वाटपाबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
social share
google news

Devendra Fadnavis Mahayuti: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) च्या पहिल्या टप्प्याचं मतदान अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेलं असतानाही महायुतीचं संपूर्ण जागा वाटप अद्यापही जाहीर झालेलं नाही. महायुतीच्या जवळजवळ 9 जागांवरील उमेदवार हे अजूनही जाहीर करण्यात आलेले नाहीत. मात्र, भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता जागा वाटपाचा फॉर्म्युला स्वत:च फोडला आहे.  (lok sabha election 2024 devendra fadnavis broke the seat allocation formula how many and which seats will be given to shinde shiv sena)

न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला (शिंदे गट) किती जागा दिल्या आहेत यावर मोठं विधान केलं आहे. यासोबत भुजबळांच्या उमेदवारीबाबत देखील त्यांनी मोठं विधान केलं आहे.

पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले...

देवेंद्र फडणवीसांनी सांगितला फॉर्म्युला...

'शिवसेना पक्षाचे सीट आम्ही ठरवत नाही.. त्यांचे जेवढे सीटिंग लोक आले आहेत तेवढ्या सीटिंग सीट त्यांना मिळाल्या आहेत, सगळ्या.. असं कुठेही नाही की, त्यांच्या सीटिंग सीट आम्ही घेतल्या आहेत. उलट त्यापेक्षा जास्त जागा त्यांना मिळतायेत..' 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'आमचा आग्रह होता की, एखाद-दुसरी जागा आम्हाला मिळावी.. सीटिंग नाही.. जी त्यांना मिळाली सीटिंग नसलेली.. ती आम्हाला मिळावी.. पण ठीक आहे असे आग्रह असतात. ते कमी जास्त होतात.' 

'एक लक्षात घ्या त्यांच्या पक्षाचे निर्णय ते स्वत: करतात आम्ही करत नाही. जागांची संख्या देखील तिघांनी ठरवली. भाजप हा सगळ्या मोठा पक्ष आहे. भाजपचं यश हे सर्वात जास्त राहिलं आहे महाराष्ट्रात.. आम्हाला हे समजतं की, आपल्यासोबत जर मित्र आले आहेत तर त्यांना योग्य वाटा द्यावा लागेल. योग्य जागा द्याव्या लागतील, सन्मान द्यावा लागेल.' असं फडणवीस यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

'छगन भुजबळांचं नाव भाजपने नाही तर...'

'नाशिकची जागा भुजबळांना देतोय की नाही हा नाहीच.. प्रश्न हा आहे की, ती जागा शिवसेना लढेल की राष्ट्रवादी लढेल. राष्ट्रवादीला ती जागा गेली तर ते ठरवतील भुजबळ साहेबांना जागा द्यायची की नाही.. शिवसेनेला सीट गेली तर शिवसेना ठरवेल ती कोणाला द्यायची. त्यामुळे जागा भुजबळ साहेबांना द्यायची की नाही असा विषयच नाही.' 

ADVERTISEMENT

'विषय हा चालला आहे की, जागा राष्ट्रवादीने लढवायची की, शिवसेनेने.. शिवसेनेचा आग्रह आहे की, आमची सीटिंग जागा आहे.. सगळ्या आमच्या सीटिंग जागा आम्हाला मिळाल्या आहेत. मग हीच एक सीटिंग जागा तुम्ही का घेता? राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की, आमचे तिथे आमदार आहेत आणि आम्हाला एकूण जागा कमी मिळतायेत.. त्यामुळे आम्हाला ही एक जागा किमान मिळाली पाहिजे.' 

'दोघांचं म्हणणं त्यांच्या लेखी बरोबर आहे. त्यातून आम्ही मधला मार्ग काढू.. 
आमचेही कार्यकर्ते आले होते माझ्याकडे त्यांनीही नाशिकसाठी आग्रह धरला होता. पण मी त्यांना समजून सांगितलं.. आपण युतीत असलो की, त्यांची मदत आपल्याला होते आपली मदत त्यांना होते. त्यामुळे मागणी करणं योग्य आहे पण निर्णय होईल त्याप्रमाणे केलं पाहिजे.' 

'मला असं वाटतं की, असं अधिकृतपणे भुजबळ साहेब बोललेलं मला कुठेही ऐकिवात नाही.. कार्यकर्ते काय बोलतात.. या संदर्भात मी काही बोलण्याचं कारण नाही.' 

'ही गोष्ट निश्चित आहे की, आम्ही तीनही पक्ष जेव्हा अमित भाईंसोबत बसलो होतो त्यावेळी हा विषय निघाला होता. त्यावेळी राष्ट्रवादी हा विषय मांडला होता की, आम्हाला ही सीट द्या.. आणि भुजबळ साहेबांसारखे नेते आमच्याकडे आहेत जे नाशिकच्या सीटवर जिंकू शकतात. त्यामुळे आम्हाला नाशिकची सीट हवी आहे असा विषय मांडला होता.' 

'त्यावेळी एकनाथ शिंदे साहेब म्हणाले होते की, ही माझी सीटिंग सीट आहे. ती काय तुम्ही घेऊ नका. त्यानंतर तो विषय तिथेच थांबला.. त्यानंतर दोघं आपआपसात बसून चर्चा करत आहेत.'

'भुजबळ साहेबांना तिकीट द्यायचं की नाही याचा भाजपशी संबंध नाही. राष्ट्रवादीने ते ठरवायचं आहे. ते राष्ट्रवादीचे नेते आहेत. राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिलं तर भाजप पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठिशी उभी राहील. भाजपला काय हवंय हा विषयच नाही.. भाजपला महायुतीचा खासदार हवा आहे.' असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT