'गणेश नाईक यांना खुमखुमी आली असेल तर....', श्रीकांत शिंदेंचं ओपन चॅलेंज; नेमकं कोणतं आव्हान दिलं?
Shrikant Shinde on Ganesh Naik : नवी मुंबई महापालिकेबाबत बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, "आमच्या चुकीमुळे दहा जागा कमी आल्या, पण ती उणीव भरून काढण्याची तयारी आहे, अशी कबुली त्यांनी दिली. इतकीच खुमखुमी असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत रिंगणात उतरा.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'गणेश नाईक यांना खुमखुमी असेल तर....',
श्रीकांत शिंदेंचं ओपन चॅलेंज; नेमकं कोणतं आव्हान दिलं?
Shrikant Shinde on Ganesh Naik, डोंबिवली : "मंत्री गणेश नाईकांना स्मृतिभंश हा मानसिक आजार झाला आहे. त्यामुळे ते किती वेळा माजी झाले आहेत ते विसरत आहेत. त्यांनी एकनाथ शिंदेंच्या आणि विशेषतः माझ्या नादी लागू नये. त्यांना खुमखुमी असेल तर येत्या लोकसभेमध्ये ठाणे किंवा कल्याण लोकसभा या कोणत्याही मतदारसंघात उभे राहून दाखवावे", असे आव्हान कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना दिले आहे. ते अंबरनाथ येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
गेल्या काही महिन्यांपासून वनमंत्री गणेश नाईक सातत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करत आहेत. नगर विकास विभाग, कल्याण लोकसभा मतदारसंघ यावरही अनेकदा गणेश नाईक बोट ठेवताना दिसतात. ठाणे महापालिकेत शतप्रतिशत भाजपाची घोषणा निवडणुकीपूर्वी नाईक यांनी करत शिंदे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पुढे महायुती या निवडणुका लढवल्या गेल्या. मात्र गणेश नाईक हे शिंदे पिता-पुत्रांवर टीका करण्याचे थांबवत नाहीत. त्यांच्या या टीकेला आता कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे.
पत्रकारांशी बोलताना डॉ. शिंदे यांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नादी लागू शकता, पण खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नादी लागू नका, असा इशारा त्यांनी दिला. तसेच, वयानुसार काही आजार होत असतात. गणेश नाईक यांना विस्मरणाचा त्रास होत असल्याचे दिसते. ते किती वेळा माजी झाले हेही त्यांना आठवत नाही, असा टोला त्यांनी लगावला. आपण डॉक्टर असल्याने हे सांगत असल्याचेही त्यांनी नमूद केले. डॉ. शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेची ताकद अधोरेखित केली. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ पालिकांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व असल्याचा दावा त्यांनी केला. येथे स्वबळावर सत्ता स्थापन केली आहे. लोकांनी मला सलग तीन वेळा मताधिक्याने निवडून दिले आहे. मला कधीही पाडले नाही, असे ते म्हणाले.










