जालन्यातील SBI बँकेच्या वाड्रीगोद्री शाखेत मध्यरात्री दरोडा, गॅस कटरने शटर तोडलं, लाखो रुपये केले लुटून नेले

मुंबई तक

Jalna News : जालन्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वाड्रीगोद्री शाखेत रात्री उशिरा दरोडा टाकण्यात आला होता. घडलेल्या घटनेनुसार अज्ञात चोरट्यांनी 14 फेब्रुवारी रोजी रात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास बँकेत घुसखोरी केली. चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून बँकेचे मुख्य शटर तोडले आणि मौल्यवान वस्तू घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.

ADVERTISEMENT

Jalna news
Jalna news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चोरट्यांनी बँकेचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पाडत केली चोरी 

point

गॅस कटरने शटर तोडलं

Jalna News : जालन्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वाड्रीगोदी शाखेत रात्री उशिरा दरोडा टाकण्यात आला होता. घडलेल्या घटनेनुसार अज्ञात चोरट्यांनी 14 फेब्रुवारी रोजी रात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास बँकेत घुसखोरी केली. चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून बँकेचे मुख्य शटर तोडले आणि मौल्यवान वस्तू घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.

हे ही वाचा : मुंबई : मॅट्रोमोनियल वेबसाईटवर मुलीनं लग्न केलं, नवरा निघाला 4 मुलांचा बाप

चोरी झालेल्या रकमेचा आकडा अद्यापही समोर नाही

चोरी झालेल्या रकमेचा अधिकृत आकडा अद्यापही समोर आलेला नाही. सकाळी बँकेचे कर्मचारी शाखेत पोहोचल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तुटलेले शटर पाहून पोलिसांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी दाखल होत सविस्तर चौकशी सुरु केली. 

चोरट्यांनी बँकेचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पाडत केली चोरी 

घटनास्थळावरून एक गॅस कटर, एक सिंलिंडर आणि इतर उपकरणे जप्त केली. प्राथमिक तपासातून समोर आले की, चोरट्यांनी बँकेचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पाडले. दरम्यान असे दिसून आले की, बँकेच्या बाहेर बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांनी घटनेनंतर पळून जाणाऱ्या पाच संशयितांना पकडले.  सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. 

हे ही वाचा : पुरुषाने केले दोन लग्न, दुसऱ्या बायकोच्या मुलाचा एक लाख रुपयांत केला सौदा... वडील मुलाच्या नात्याला काळीमा

व्यवसायिक टोळीचा सहभाग असल्याचा संशय 

पोलिसांच्या मते ही घटना सुनियोजित असून एका व्यवसायिक टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे. या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच स्थानिक रहिवाशांनी बँका आणि इतर संस्थांवरील सुरक्षा आणखी मजबूत करण्याची मागणी केली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp