पुरुषाने केले दोन लग्न, दुसऱ्या बायकोच्या मुलाचा एक लाख रुपयांत केला सौदा... वडील मुलाच्या नात्याला काळीमा

मुंबई तक

Crime News : वडिलांनी मुलाला एक लाख रुपयांत विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जलद कारवाई करत मुलाला या प्रसंगातून सुखरूप बाहेर काढले, या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वडील आणि मुलाच्या नात्याला काळीमा

point

बापाने मुलाला एक लाख रुपयांना विक्रीस काढले

Crime News : ओडिशातील बालासोर येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडिलांनी मुलाला एक लाख रुपयांत विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जलद कारवाई करत मुलाला या प्रसंगातून सुखरूप बाहेर काढले, या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं वडील आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासली गेली आहे. 

हे ही वाचा :   पुतण्यासोबत लपून व्हॅलेंटाईन्स डे साजरा करत होती, नवऱ्याने पकडलं अन्..., सबंध गाव हादरलं!

संबंधित प्रकरणात एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बालासोर येथील नीलगिरी अधिसूचित क्षेत्र परिषदेतील बारीसाही गावात घडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर हे प्रकरण उघडकीस आले, ज्यात वडिलच आपल्या मुलाचा सौदा करताना दिसत आहेत.

दरम्यान, व्हिडिओ समोर आल्यानंतर एका स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, चिमिनीभाटी परिसरातून मुलाला ताब्यात घेण्यात आले आणि बाल कल्याण समिती सीडब्ल्यूसीकडे सोपवण्यात आले. त्यांनी सांगितलं की, या प्रकरणी सविस्तरपणे चौकशी सुरु आहे आणि दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आणि बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आले. 

आरोपीच्या वडिलांची ओळख पटली

या प्रकरणी दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान पोलिसांना आरोपीला वडिलांची ओळख पटली आहे. तो व्यवसायाने गवंडी काम करतो. कराराचा भाग म्हणून त्याने 50 हजार रुपयांच्या हप्ता घेतल्याचा आरोप आहे. चौकशीदरम्यान त्याने आर्थिक अडचणींची काही कारणं सांगितली. त्याने सांगितले की त्याला चार मुले आहेत आणि त्याच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी मोठी आर्थिक समस्या निर्माण होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp