पुतण्यासोबत लपून व्हॅलेंटाईन्स डे साजरा करत होती, नवऱ्याने पकडलं अन्..., सबंध गाव हादरलं!
Crime News : व्हॅलेंटाईन्स डे दिवशी बऱ्याच खळबळजनक घटना घडल्या. अशीच एक घटना आज समोर आली आहे. आपल्या पुतण्यासोबत रात्रीच्या वेळेस लपून-छपून व्हॅलेंटाईन्स डे साजरा करत असताना एका विवाहित महिलेला पकडण्यात आले आहे. यानंतर जे घडले त्यामुळे सबंध गाव हादरुन गेलं. पोलिसदेखील यामुळे चकित झाले. नेमकी घटना काय आहे, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुतण्यासोबत लपून व्हॅलेंटाईन्स डे साजरा करत होती,
नवऱ्याने पकडलं अन्...
Crime News : व्हॅलेंटाईन्स डे दिवशी बऱ्याच खळबळजनक घटना घडल्या. अशीच एक घटना आज समोर आली आहे. आपल्या पुतण्यासोबत रात्रीच्या वेळेस लपून-छपून व्हॅलेंटाईन्स डे साजरा करत असताना एका विवाहित महिलेला पकडण्यात आले आहे. यानंतर जे घडले त्यामुळे सबंध गाव हादरुन गेलं. पोलिसदेखील यामुळे चकित झाले. नेमकी घटना काय आहे, जाणून घेऊया.
हे ही वाचा : वीट भट्टीवर काम करणाऱ्या विधवा महिलेवर 12 तास बलात्कार, मालकाचे कृत्य; पोलिस कारवाई करायला घाबरले
पाच वर्षांपासून प्रेमसंबंध
उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील ही घटना आहे. पूजा नावाच्या महिलेचे 8 वर्षांपूर्वी पंकज नावाच्या तरुणाशी लग्न झाले होते आणि त्यांना दोन मुलेही आहेत. सुखाचा संसार सुरु असतानाच पूजाचे तिच्या पुतण्याशी प्रेमसंबंध जुळले. गेल्या 5 वर्षांपासून हे दोघे लपून-छपून भेटत होते. 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने हे दोघे एकत्र असताना कुटुंबीयांनी त्यांना रंगेहाथ पकडले, ज्यामुळे घरात मोठा राडा झाला.
पोलिस स्टेशनमध्ये काय घडले?
वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. पती पंकज, पत्नी पूजा आणि तो पुतण्या तिघेही पोलीस ठाण्यात हजर झाले. तिथे बराच वेळ समजुतीचा प्रयत्न करण्यात आला, मात्र पत्नी आपल्या प्रियकर पुतण्यासोबत राहण्यावर ठाम होती. अखेर कोणताही मार्ग निघत नसल्याचे पाहून पती पंकजने अत्यंत कठोर आणि अनपेक्षित निर्णय घेतला. त्याने स्वतः पुढाकार घेऊन पोलीस ठाण्याच्या परिसरातच आपल्या पत्नीचे लग्न स्वतःच्या पुतण्याशी लावून दिले.