वीट भट्टीवर काम करणाऱ्या विधवा महिलेवर 12 तास बलात्कार, मालकाचे कृत्य; पोलिस कारवाई करायला घाबरले

मुंबई तक

Woman Labourer raped By owner : वीट भट्टी मालक आणि त्याच्या दोन मित्रांनी कामगार महिवलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तिघांनी मिळून तिच्यावर 12 तास अत्याचार केले. या महिलेच्या नवऱ्याचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. तेव्हापासूनच मालकाची तिच्यावर वाईट नजर होती. संधी मिळताच मालकाने आणि त्याच्या मित्रांनी महिलेचे अपहरण केले आणि तिच्यावर अत्याचार केले.

ADVERTISEMENT

Woman Labourer raped By owner
Woman Labourer raped By owner
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वीट भट्टीवर काम करणाऱ्या विधवा महिलेवर 12 तास बलात्कार, मालकाचे कृत्य

point

पोलिस कारवाई करायला घाबरले

Woman Labourer raped By owner : वीट भट्टी मालक आणि त्याच्या दोन मित्रांनी कामगार महिवलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तिघांनी मिळून तिच्यावर 12 तास अत्याचार केले. या महिलेच्या नवऱ्याचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. तेव्हापासूनच मालकाची तिच्यावर वाईट नजर होती. संधी मिळताच मालकाने आणि त्याच्या मित्रांनी महिलेचे अपहरण केले आणि तिच्यावर अत्याचार केले. उत्तरप्रदेशातील पटहेरवा परिसरातील ही घटना आहे.

हे ही वाचा : पत्नीचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध! तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन कालव्यात फेकले

अपहरण करुन 12 तास अत्याचार

9 फेब्रुवारीच्या रात्री विजय कुशवाहा (वीट भट्टी मालक) आपल्या दोन मित्रांसह चारचाकी वाहनातून आला आणि पीडितेचे अपहरण केले. यानंतर तिला परडौना नावाच्या ठिकाणी एका खोलीत नेऊन सुमारे 12 तास डांबून ठेवले आणि तिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या घटनेनंतर पीडितेने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. मात्र, सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

फक्त छेडछाड केल्याचा गुन्हा

धक्कादायक म्हणजे पीडितेने बलात्काराचा गंभीर आरोप केला असतानाही पोलिसांनी केवळ छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे. भट्टी मालकाला चौकशीसाठी बोलावले असता तो हजर झाला नाही आणि सध्या तो फरार आहे. पोलिसांनी भट्टी मालक आणि त्याच्या दोन अज्ञात साथीदारांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली असली तरी, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp