पत्नीचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध! तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन कालव्यात फेकले

मुंबई तक

Trinmool Congress Worker Murder : एकीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री एसआयआर विरुद्ध जोरदार लढा देत आहेत; तर दुसरीकडे एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नसीर अली असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. त्याची हत्या करुन त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन विविध कालव्यांमध्ये फेकण्यात आले होते. पोलिसांनी मृतदेहाचे सर्व तुकडे जमा केले आहेत. सोमवारी आलेल्या एका कॉलनंतर ते घराबाहेर पडले होते. त्यानंतर त्यांचा काहीच ठावठिकाणा नव्हता. मात्र नागरिकांच्या निदर्शनांमुळे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली अन् यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली.

ADVERTISEMENT

Trinmool Congress Worker Murder
Trinmool Congress Worker Murder
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध!

point

तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन कालव्यात फेकले

Trinmool Congress Worker Murder : एकीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री एसआयआर विरुद्ध जोरदार लढा देत आहेत; तर दुसरीकडे एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नसीर अली असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. त्याची हत्या करुन त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन विविध कालव्यांमध्ये फेकण्यात आले होते. पोलिसांनी मृतदेहाचे सर्व तुकडे जमा केले आहेत. सोमवारी आलेल्या एका कॉलनंतर ते घराबाहेर पडले होते. त्यानंतर त्यांचा काहीच ठावठिकाणा नव्हता. मात्र नागरिकांच्या निदर्शनांमुळे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली अन् यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली. पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे ही वाचा : चंद्रपूर : तरुणीचे बॉयफ्रेंडशी प्रेमसंबंध अन् लग्न दुसऱ्याशी, प्रियकराने नवऱ्याला 'ते' फोटो पाठवले, नंतर कपडे काढून मारलं

दोन संशयित ताब्यात

नसीर अली बेपत्ता झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची मोटारसायकल एका कालव्यात सापडली होती. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. पोलिसांनी तपासात दिरंगाई केल्याचा आरोप करत संतप्त जमावाने रास्ता रोको करत जोरदार निदर्शने केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि दोन दिवसांत रिजवान हसन मंडल आणि सागर गेन या दोन संशयितांना अटक केली. यातील मंडल हा  बूथ लेव्हल ऑफिसर  म्हणून कार्यरत आहे.

विविध कालव्यांमध्ये मृतदेहाचे तुकडे

पोलिस कोठडीत असलेल्या दोन्ही आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर या भीषण हत्याकांडाचा उलगडा झाला. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी बादुरिया परिसरातील विविध कालव्यांमध्ये शोध मोहीम राबवली. अनेक तासांच्या शोध कार्यानंतर नसीर अली यांच्या मृतदेहाचे छिन्नविच्छिन्न तुकडे पोलिसांच्या हाती लागले. हे दृश्य पाहून परिसरात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp