रक्ताच्या थारोळ्यात व्हॅलेंटाईन्स डे! कारमध्ये सापडला प्रेमीयुगुलाचा मृतदेह; कोणी घातल्या गोळ्या?

मुंबई तक

Couple death on Valentines day : व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे प्रेम साजरं करण्याचा दिवस. मात्र आजूबाजूला प्रेम साजरं होत असतानाच एका प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे.  एका कारमध्ये तरुण आणि तरुणीचे गोळी लागलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. दोघांच्याही डोक्यात गोळ्या लागल्याचे समोर आले आहे.  प्राथमिक अंदाजानुसार, प्रेमप्रकरणातून या दोघांनीही स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे

ADVERTISEMENT

Couple death on Valentines day
Couple death on Valentines day
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एकीकडे व्हॅलेंटाईन्स डे साजरा होतोय

point

तर दुसरीकडे कारमध्ये सापडला जोडप्याचा मृतदेह

point

कोणी घातल्या गोळ्या?

Couple death on Valentines day : व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे प्रेम साजरं करण्याचा दिवस. मात्र आजूबाजूला प्रेम साजरं होत असतानाच एका प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे.  एका कारमध्ये तरुण आणि तरुणीचे गोळी लागलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. दोघांच्याही डोक्यात गोळ्या लागल्याचे समोर आले आहे.  प्राथमिक अंदाजानुसार, प्रेमप्रकरणातून या दोघांनीही स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर-39 परिसरातील ही घटना आहे.

हे ही वाचा : होणाऱ्या नवऱ्याच्या फोनमध्ये दुसऱ्या मुलीचा फोटो पाहिला... संतापलेल्या तरुणीच्या कृत्यामुळे होत्याचं नव्हतं झालं

कारमध्ये आढळले मृतदेह

शनिवारी दुपारी एकच्या सुमारास एका व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या अल्ट्रोज कारमध्ये दोन व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा कार आतून लॉक होती. पोलिसांनी कारची काच फोडून दोघांना बाहेर काढले. तपासादरम्यान तरुणाच्या हातात पिस्तूल आढळले असून, दोघांच्याही डोक्यात गोळ्या लागल्या होत्या. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत.

मृतांची ओळख पटली 

मृतांची ओळख पटली असून, सुमित (32 वर्षे, रा. दिल्ली) आणि रेखा (26 वर्षे, रा. नोएडा) अशी त्यांची नावे आहेत. पोलीस तपासात समोर आले आहे की, सुमित शुक्रवारी सकाळपासूनच घरातून निघून गेला होता आणि त्याचा काहीही पत्ता लागत नव्हता. तर रेखा नोएडातील सेक्टर-62 मधील एका खासगी कंपनीत काम करत होती. ती सुद्धा शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता ऑफिसमधून निघाल्यानंतर घरी परतली नव्हती.

हे वाचलं का?

    follow whatsapp