Maharashtra Weather : वारं फिरलं, 'या' जिल्ह्यांत पावसाची धुव्वादार बॅटिंग, IMD चा अलर्ट

Maharashtra Weather : ऑक्टोबर महिन्याच्या अगदी शेवटात राज्यातील हवामानात सतत बदल जाणवताना दिसून येत आहे. काही भागांत पावसाची उघडझाप सुरू आहे, तर काही भागांत हवामान विभागाने वातावरण कोरडं राहील अशी शक्यता वर्तविली. अशातच जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे... 

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

राज्यातील हवामानात सतत बदल

point

काही जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra Weather : ऑक्टोबर महिन्याच्या अगदी शेवटात राज्यातील हवामानात सतत बदल जाणवताना दिसून येत आहे. काही भागांत पावसाची उघडझाप सुरू आहे, तर काही भागांत हवामान विभागाने वातावरण कोरडं राहील अशी शक्यता वर्तविली. भारतीय हवामान विभागाने 28 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलेल्या अंदाजानुसार, बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. अशातच जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे... 

हे ही वाचा : अहिल्यानगर: दहा वर्षांचे प्रेमसंबंध, प्रियकराचा संशय अन् 42 वर्षीय महिलेची हत्या

कोकण 

कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड  या जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. मात्र रत्नागिरीत मेघगर्सनेसह सरी कोसळतील, तर सिंधुदुर्गात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस किंवा मेघगर्जनेची शक्यता आहे. नाशिक आणि अहिल्यानगरात 28 ऑक्टोबर रोजी हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मात्र, नाशिकच्या घाटमाथा परिसरात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत हवामानात बदल जाणवण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांत हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे. तर सांगलीत हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा आणि घाटमाथा परिसरात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या तिन्ही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे, तसेच यलो अलर्टची शक्यता वर्तविली आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे, तर बीड जिल्ह्यात वातावरण कोरडं राहील असा अंदाज आहे. 

हे ही वाचा : जालना: 26 वर्षीय तरुणावर कुऱ्हाडीनं हल्ला, लहान भावानं मोठ्या भावाला संपवलं

विदर्भ 

विदर्भातील अकोला, अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. भंडारा, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे, याच जिल्ह्यांना यलो अलर्टचा अंदाज वर्तविलेला आहे. गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजद आहे, या जिल्ह्याला ऑरेंज अलर्टची शक्यता आहे.