मुंबई: महिला तीन मुलांसह पतीला गेली सोडून, गटारात आढळला कुजलेला मृतदेह

Crime news : रुखसाना ही 26 जुलै रोजी प्रियकर साकिबसोबत मुंबईला जाण्यासाठी पती आणि तीन मुलांना सोडून गेली होती. सप्टेंबर रोजी सांताक्रूझमधून गुढ परिस्थितीत बेपत्ता झाली आणि 18 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील एका नाल्यात तिचा मृतदेह आढळून आला होता.

ADVERTISEMENT

Crime news
Crime news
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

रुखसाना आणि साकीब एकमेकांच्या प्रेमात

point

नाल्यात रुखसानाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह

Crime news : बिजनौरच्या सडकपूर गावातील रहिवासी असलेल्या रुखसाना ही 26 जुलै रोजी प्रियकर साकिबसोबत मुंबईला जाण्यासाठी पती आणि तीन मुलांना सोडून गेली होती. सप्टेंबर रोजी सांताक्रूझमधून गुढ परिस्थितीत बेपत्ता झाली आणि 18 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील एका नाल्यात तिचा मृतदेह आढळून आला होता. रुखसानाच्या वडिलांनी तिचा प्रियकर साकिबवर हत्येचा आरोप केला. गावात पोहोचल्यानंतर कुटुंब दु:खाने व्याकूळ झाले असून पोलीस निष्पक्षपणे तपास करत आहेत. 

हे ही वाचा : नवी मुंबई: प्रेयसीसाठी बदललं नाव, दुर्लक्ष केल्यानं प्रियकरानं चाकूने वार करत तरुणीला संपवलं

रुखसाना आणि साकीब एकमेकांच्या प्रेमात

बिजनौरच्या रेहाद भागात सडकपूर गावात राहणाऱ्या रुखसाना आणि साकीब हे एकमेकांच्या प्रेमसंबंधातच होते. समाजामुळे त्यांनी एकमेकांशी विवाह केला नाही, परिणाम रुखसानाने लग्न कंठ गावात झाले आणि तिला तीन मुले देखील झाली. जुलै 2026 मध्ये ती पुन्हा साकिबच्या संपर्कात येऊ लागली होती. तिला परत आणण्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी प्रयत्न करुनही तिने पती आणि मुलांसोबत राहण्यास पूर्णपणे नकार दिला होता, नंतर ती हट्टाने मुंबईत परतली होती. मुंबई साकीब हा ऑटो चालवायचा. 

रुखसाना आणि साकिबच्या पत्नीमधील तणाव वाढला

मुंबईत आल्यानंतर साकिबची पत्नी तिथेच राहायला होती, त्यामुळे रुखसाना आणि साकिबच्या पत्नीमधील तणाव आणखी वाढत गेला होता. 26 सप्टेंबर रोजी रुखसाना ही मुंबईच्या सांताक्रूझ परिसरातून अचानक गायब झाली होती. तिचा प्रियकर साकिबने तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार वाकोला पोलीस ठाण्यात केली, नंतर मुंबई पोलिसांनी तिचा शोध घेतला, परंतु अनेक दिवस तिचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. 

नाल्यात रुखसानाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह

18 ऑक्टोबर रोजी, तिच्या बेपत्ता होण्याच्या काही आठवड्यांत मुंबईतील वांद्रे परिसरातील कचराकुंडीनजीक असलेल्या एका नाल्यात रुखसानाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, तिच्या कुटुंबीयांनी मुंबई येऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि मृतदेह हा बिजनौरला आणला. रुखसानाचे वडील इरफान यांनी तिचा प्रियकर, साकिबवर, तिची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा थेट आरोप करण्यात आला. त्यांचा दावा असाय की, साकिबने त्यांच्या मुलीला प्रेमप्रकरणाच्या जाळ्यात ओढून तिचा जीव घेतला. 

हे ही वाचा : फुलंब्रीत महिला रुग्णावर कथितरित्या बलात्कार, डॉक्टर आणि BJP शहराध्यक्ष अटकेत

शोकाकुल असलेल्या कुटुंबाने आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्याची आणि कुटुंबाने न्यायाची मागणी केली. रुखसानाच्या मृत्यूमागील खरे कारण तपासातून उघडकीस येईल.