नवी मुंबई: प्रेयसीसाठी बदललं नाव, दुर्लक्ष केल्यानं प्रियकरानं चाकूने वार करत तरुणीला संपवलं
Navi mumbai crime : तरुणीने आपल्या प्रियकराकडे दुर्लक्ष केल्याच्या रागातून चाकूने हल्ला केल्याची दुर्दैवी घटना आहे. उपचारादरम्यान तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना नेरूळ रेल्वे स्थानकाजवळ पूर्वेकडील बस स्थानकाजवळ घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अनिल हे नाव हटवून दानिश असे नाव ठेवले
बस स्थानकाजवळ झाला वाद अन् प्रेयसीला संपवले
Navi Mumbai Crime : तरुणीने आपल्या प्रियकराकडे दुर्लक्ष केल्याच्या रागातून चाकूने हल्ला केल्याची दुर्दैवी घटना आहे. उपचारादरम्यान तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना नेरूळ रेल्वे स्थानकाजवळ पूर्वेकडील बस स्थानकाजवळ घडली आहे. मृत तरुणीची सादिया शेख अशी ओळख समोर आली, तसेच आरोपीची दानिश अंसारी अशी ओळख समोर आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
हे ही वाचा : फुलंब्रीत महिला रुग्णावर कथितरित्या बलात्कार, डॉक्टर आणि BJP शहराध्यक्ष अटकेत
अनिल हे नाव हटवून दानिश असे नाव ठेवले
पोलिसांच्या माहितीनुसार, सादिया आणि दानिश यांच्यात मागील चार वर्षांपासून एकमेकांसोबत मैत्री होती. सांगितले जाते की, दानिशने सादियासाठी धर्मपरिवर्तन केले होते. त्याने अनिल हे नाव हटवून दानिश असे नाव ठेवले. मागील काही महिन्यांपासून सादियाने अनिलकडे दुर्लक्ष केले, यामुळे तो अधिकच नाराज होता.
बस स्थानकाजवळ झाला वाद
नेरुळ रेल्वे स्थानकाजवळी पूर्वेकडील परिसरात वाद झाला होता. यादरम्यान दानिशने सादियावर चाकूने हल्ला केला आणि घटनास्थळावरून फरार झाला. गंभीर असलेल्या सादियाच्या उपचारासाठी सायन रुग्णालयात भरती करण्यात आले होते. 21 ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हे ही वाचा : बीड: वधूने लग्नासाठी उकळले अडीच लाख, 48 तासांतच फसवणुकीचे रॅकेट
या प्रकरणात पोलिसांनी हत्येच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास आणि सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा तपास करण्यात आला. यानंतर दानिश अंसारीला घनसोलीतील एका नातेवाईकाच्या घरातून अटक करण्यात आली होती. पोलिसांनी तपासातून हल्ल्यात वापरलेला चाकू जप्त केला. आरोपीला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
