चंद्रपूर : तरुणीचे बॉयफ्रेंडशी प्रेमसंबंध अन् लग्न दुसऱ्याशी, प्रियकराने नवऱ्याला 'ते' फोटो पाठवले, नंतर कपडे काढून मारलं

मुंबई तक

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने प्रेयसीच्या दुसऱ्या मित्राला व्हॉट्सअॅपद्वारे फोटो पाठवले, यामुळे तरुणीचा विवाह देखील मोडीत निघाला आहे. संतापलेल्या कुटुंबातील सदस्यांनी त्याला बेदम मारहाण केली आणि हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले.

ADVERTISEMENT

Chandrapur News
Chandrapur News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तरुणाला दोरीने बांधून जबर मारहाण

point

नवसागर बोरकरचे 23 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध

Chandrapur News : विकास राजुरकर - चंद्रपूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने प्रेयसीच्या दुसऱ्या मित्राला व्हॉट्सअॅपद्वारे फोटो पाठवले, यामुळे तरुणीचा विवाह देखील मोडीत निघाला आहे. संतापलेल्या कुटुंबातील सदस्यांनी त्याला बेदम मारहाण केली आणि हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. तीन वर्षांच्या नातेसंबंधानंतर तरुणीने दुसऱ्याच तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता, अशातच तरुणाने प्रेयसीचा फोटो दुसऱ्या पुरुषाला पाठवला ज्याच्यासोबत तिचे लग्न ह ोणार होते.

हे ही वाचा : होणाऱ्या नवऱ्याच्या फोनमध्ये दुसऱ्या मुलीचा फोटो पाहिला... संतापलेल्या तरुणीच्या कृत्यामुळे होत्याचं नव्हतं झालं

तरुणाला दोरीने बांधून जबर मारहाण

संबंधित प्रकरणात संतापलेल्या तरुणीच्या सहा जवळच्या नातेवाईकांनी तरुणाला दोरीने बांधून बेदम मारहाण केली. ही घटना 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडल्याचे वृत्त आहे. पीडितेनं तक्रार करून तळोधी बाळापूर पोलिसांनी त्याच्यावर हल्ला करणाऱ्या सहा पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचं वृत्त समोर आले. 

नवसागर बोरकरचे 23 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध

नागभीड तहसील तळोधी पोलीस ठाण्यातील सावरगाव येथील नवसागर बोरकर (26) याचे गेल्या तीन वर्षांपासून त्याच्याच गावातील 23 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. पीडित नवसागर म्हणतात की, त्याची प्रेयसी अनेकदा लग्नाबद्दल बोलायची आणि वारंवार त्याच्याकडे पैशांची मागणी करायची. नवसागर तिला ऑनलाईन तर कधी रोख पैसे देखील द्यायचा अशी माहिती समोर आली आहे.  

दुसऱ्या तरुणाला दोघांचे पाठवले फोटो

प्रेयसी दुसऱ्याच तरुणाशी बोलायची आणि नवसागरकडे दुर्लक्ष करायची. नवसागरला हे लक्षात आल्यानंतर त्याने तिच्याशी संपर्क साधणे बंद केले आणि पैशांची मागणी केली, तिने पैसे परत देण्यास नकार दिला. संतापलेल्या नवसागर बोरकरने 11 फेब्रुवारी रोजी प्रेयसीचे ज्या तरुणाशी प्रेमसंबंध होते त्या तरुणाला दोघांचे फोटो पाठवले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp