वडिलांनी आठ महिन्यांच्या मुलीवर कात्रीने वार करत संपवलं, नंतर स्वत:ही गळफास घेत उचललं टोकाचं पाऊल
Crime News : मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सांगानेर येथील मालपुरा गेट पोलीस ठाणे परिसरात वडिलांनी स्वत:च्याच आठ महिन्यांच्या मुलीची हत्या केली, त्यानंतर स्वत: गळफास घेऊन जीवन संपवलं. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वडिलांनी आठ महिन्याच्या मुलीवर कात्रीने केले वार
चिमुरडीची हत्या करून स्वत: गळफास घेत संपवलं जीवन
Crime News : राजस्थानच्या जयपूरमध्ये एक मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सांगानेर येथील मालपुरा गेट पोलीस ठाणे परिसरात वडिलांनी स्वत:च्याच आठ महिन्यांच्या मुलीची हत्या केली, त्यानंतर स्वत: गळफास घेऊन जीवन संपवलं. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे ही वाचा : 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? त्यांनी पळ का काढला'; संजय राऊतांनी ट्वीट केला व्हिडीओ
वडिलांनी आठ महिन्याच्या मुलीवर कात्रीने केले वार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वडिलांनी आपल्या मुलीवर कात्रीने वार केले. मुलगी केवळ आठ महिन्यांची होती, वार इतके गंभीर होते की लहान मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी माहिती मिळवत घटनास्थळी कोण उपस्थित होते याचा तपास सुरु केला.
चिमुरडीची हत्या करून स्वत: गळफास घेत संपवलं जीवन
चिमुरडीची हत्या करून आरोपी वडिलांनी स्वत: गळफास घेत आपलं जीवन संपवलं. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला ताब्यात घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. मुलीसोबत बापानं असं हैवानी कृत्य करून गळफास का घेतला असावा? या प्रश्नाचं उत्तर पोलीस शोधत आहेत.
हे ही वाचा : रक्ताच्या थारोळ्यात व्हॅलेंटाईन्स डे! कारमध्ये सापडला प्रेमीयुगुलाचा मृतदेह; कोणी घातल्या गोळ्या?
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिसरातील रहिवाशांना अशी घटना घडेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. लहान मुलीची हत्या केल्याने घटनास्थळी घबराट पसरल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी सखोल तपास करत आरोपीची चौकशी केली असून कुटुंबाचा देखील तपास सुरु आहे. याच तपासातून अवघ्या 8 महिन्यांच्या मुलीच्या खूनाचे कारण समोर येऊ शकते.










