'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? त्यांनी पळ का काढला'; संजय राऊतांनी ट्वीट केला व्हिडीओ

मुंबई तक

Sanjay Raut on Rahul Narwekar Video : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडीओ X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्वर शेअर केलाय. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

ADVERTISEMENT

Sanjay Raut on Rahul Narvekar
Sanjay Raut on Rahul Narvekar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? त्यांनी पळ का काढला"

point

संजय राऊतांनी ट्वीट केला व्हिडीओ

Sanjay Raut on Rahul Narwekar Video : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये राहुल नार्वेकर यांच्यासोबतच्या लोकांचा स्थानिकांसोबत वाद झाल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये स्थानिकांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याचं देखील पाहायला मिळत आहे. यावेळी राहुल नार्वेकर देखील त्याठिकाणी उपस्थित आहेत आणि ते तिथून निघून जाताना पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ अलिबागमधील असल्याची प्राथमिक माहिती आहे. शेतजमीनीच्या मोजणीवरुन हा वाद झाल्याचं बोललं जातंय. 

हेही वाचा : मुंबईतील मुलुंड मेट्रो स्टेशनचा स्लॅब कोसळला, दुर्घटनेत दोघेजण गंभीर जखमी, वाहनांचा झाला चेंदामेंदा

संजय राऊत व्हिडीओ शेअर करताना काय म्हणाले? 

"विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे! तुम्ही सांगताय की मी सांगू?", असं कॅप्शन संजय राऊतांनी शेअर केलेल्या व्हिडीओला दिलंय. शिवाय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पीएमओ इंडियाला टॅग केलंय. या संपूर्ण प्रकरणाची माहिती तुम्ही सांगताय की, मू सांगू असं म्हणत संजय राऊतांनी या प्रकरणाचा खुलासा करण्याची मागणी केलीये. 

दरम्यान, राहुल नार्वेकर या व्हिडीओबाबत काय भूमिका मांडणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. राहुल नार्वेकरांनी अद्याप याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेली नाही. 

हे वाचलं का?

    follow whatsapp