अॅडिशनल प्रोफेसरने MD निवासी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप, तात्काळ निलंबनाचे आदेश...
पेडियाट्रिक विभागाच्या एमडी निवासी डॉक्टरने विभागाच्या एका अॅडिशनल प्राध्यापकावर विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराचं आरोप केला आहे. विद्यापीठाच्या प्रशासनाकडून तातडीने कारवाई करत घटनेतील आरोपी प्रोफेसरला निलंबित करण्यात आलं असून डिपार्टमेंटमध्ये आरोपीच्या प्रवेशावर बंदी आणली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अॅडिशनल प्रोफेसरने MD निवासी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप
आरोपीच्या तात्काळ निलंबनाचे आदेश
Crime News: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील किंग जॉर्ज मेडिकल यूनिव्हर्सिटी (KGMU) मधून लैंगिक अत्याचाराचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. पेडियाट्रिक विभागाच्या एमडी निवासी डॉक्टरने विभागाच्या एका अॅडिशनल प्राध्यापकावर विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराचं आरोप केला आहे. संबंधित प्रकरणाची तक्रार मिळताच, विद्यापीठाच्या प्रशासनाकडून तातडीने कारवाई करत घटनेतील आरोपी प्रोफेसरला निलंबित करण्यात आलं असून डिपार्टमेंटमध्ये आरोपीच्या प्रवेशावर बंदी आणली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निवासी डॉक्टरने तक्रारीत आरोप केला आहे की, संबंधित प्राध्यपकाने तिला खोलीत बोलवून तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं आणि तिचा विनयभंग केला.
आरोपीच्या निलंबनाचे आदेश
प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन KGMU प्रशासनाने तात्काळ याची दखल घेतली. विद्यापीठाचे प्रवक्ते डॉ. के. के. सिंह यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी अॅडिशनल प्रोफेसरवर प्राथमिक कारवाई करण्यात आली आहे आणि त्याच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत जेणेकरून तपास निष्पक्ष पद्धतीने करता येईल. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रशासनाने अंतर्गत तक्रार समिती (विशाखा समिती/आयसीसी) स्थापन केली आहे. ही समिती संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल आणि आपला अहवाल सादर करेल, ज्याच्या आधारे पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल.
हे ही वाचा: 'त्याला त्याच्या भाषेमुळे अन्...', पुण्यात पश्चिम बंगालच्या युवकाची हत्या झाल्यानंतर ममता बॅनर्जींची पोस्ट; काय म्हणाल्या?
लैंगिक अत्याचाराचं तिसरं प्रकरण...
धक्कादायक बाब म्हणजे, KGMU मध्ये मागील 50 दिवसांत लैंगिक अत्याचाराचं हे तिसरं प्रकरण समोर आलं आहे. अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे संस्थेच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर आणि कामाच्या ठिकाणी लोकांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. सध्या, प्रशासनाच्या मते पीडित विद्यार्थीनीच्या गोपनीयतेची पूर्णपणे काळजी घेतली जात आहे तसेच तपास पूर्णपणे निष्पक्ष आणि वेळेवर केला जाईल.










