'त्याला त्याच्या भाषेमुळे अन्...', पुण्यात पश्चिम बंगालच्या युवकाची हत्या झाल्यानंतर ममता बॅनर्जींची पोस्ट; काय म्हणाल्या?

मुंबई तक

पुण्यात एका 24 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. या हत्येप्रकरणी आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच, त्यांना याबाबत आरोपसुद्धा केले आहेत.

ADVERTISEMENT

हत्येनंतर ममता बॅनर्जींची पोस्ट; काय म्हणाल्या?
ममता बॅनर्जींची पोस्ट; काय म्हणाल्या?
google news

बातम्या हायलाइट

point

पश्चिम बंगालच्या तरुणाची पुण्यात हत्या..

point

हत्येनंतर ममता बॅनर्जींची पोस्ट

point

म्हणाल्या, 'त्याला त्याच्या भाषेमुळे अन्...'

Pune Crime: पुण्यात एका 24 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. या हत्येप्रकरणी आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी आरोप केला की, तरुणाला त्याची ओळख आणि त्याच्या मूळ ठिकाणाच्या आधारे लक्ष्य करण्यात आलं, त्याचा पाठलाग करण्यात आला, छळ करण्यात आला आणि अखेर त्याची हत्या करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण हा पुण्यातील एका खाजगी कंपनीत कार्यरत होता आणि तो त्याच्या तीन भावांसोबर शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका खोलीत राहत होता. दोन दिवसांपूर्वी कोरेगाव परिसरात एका हॉटेलच्या मागे त्याचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला. 

पोलिसांच्या तपासात समोर आलं की, घटनेच्या दिवशी पीडित तरुण त्याच्या कंपनीत कामासाठी गेला नव्हता आणि दुपारी 3 वाजल्यापासून त्याने मद्यपान केलं. त्यावेळी, दारू पित असताना त्याच्या कोणासोबत वाद झाला असावा आणि त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की, या घटनेतील दोन संशयितांची ओळख पटवण्यात आली असून त्यांना लवकरच ताब्यात घेतलं जाईल. 

हे ही वाचा: मोठ्या हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल वेश्याव्यवसाय... पोलिसांनी छापा टाकताच तब्बल 11 महिलांना घेतलं ताब्यात

एक्सवरील पोस्टमध्ये ममता बॅनर्जी काय म्हणाल्या? 

"मला धक्का बसला आहे, राग आला आहे आणि शब्दांत सांगता येणार नाही असं दुःख झालं आहे. महाराष्ट्रातील पुण्याच्या पुरुलिया जिल्ह्यातील बंदवान परिसरात 24 वर्षीय स्थलांतरित कामगार सुकेन महतो याची क्रूर हत्या अत्यंत अमानुष आणि निषेधार्ह आहे. तो त्याच्या कुटुंबाचा एकमेव कमवता सदस्य होता."

हे वाचलं का?