मोठ्या हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल वेश्याव्यवसाय... पोलिसांनी छापा टाकताच तब्बल 11 महिलांना घेतलं ताब्यात

मुंबई तक

पोलिसांनी एका हाय-प्रोफाइल वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी स्पष्ट केलं की अनेक महिन्यांपासून हे वेश्याव्यवसाय रॅकेट हॉटेलच्या नावाखाली कार्यरत होते. पोलिसांनी तात्काळ कायदेशीर परवानगी घेतली, एक विशेष पथक तयार करण्यात आलं आणि हॉटेलवर छापा टाकला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मोठ्या हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल वेश्याव्यवसाय...

point

पोलिसांनी छापा टाकताच तब्बल 11 महिलांना घेतलं ताब्यात

Crime News: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. गाझियाबादच्या कौशांबी पोलिस स्टेशन परिसरात असलेल्या हॉटेल सरोवर पोर्टिकोमध्ये पोलिसांनी एका हाय-प्रोफाइल वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी स्पष्ट केलं की अनेक महिन्यांपासून हे वेश्याव्यवसाय रॅकेट हॉटेलच्या नावाखाली कार्यरत होते. व्हॉट्सअॅपद्वारे क्लायंट बुकिंग केले जात होते. हाय-प्रोफाइल व्यक्ती हॉटेलच्या महागड्या खोल्यांमध्ये राहायचे आणि तिथे त्यांना त्यांच्या आवडीच्या मुली दिल्या जायच्या. या रॅकेटची माहिती मिळाल्यानंतर, गाझियाबाद पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला आणि तिथून 11 महिलांना ताब्यात घेतलं. पोलीस आता या रॅकेटमधील महिला आणि मुलींची अधिक चौकशी करतील. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून सध्या त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. 

महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलं... 

हॉटेल मालकानेच या महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे पोलिसांचं म्हणणे आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेचा खुलासा करताना सांगितले की, 11 जानेवारी रोजी कौशंबी परिसरातील एका हॉटेलमध्ये संशयास्पद आणि अनैतिक कृत्ये सुरू असल्याची त्यांना माहिती मिळाली. त्यानंतर, पोलिसांनी तात्काळ कायदेशीर परवानगी घेतली, एक विशेष पथक तयार करण्यात आलं आणि हॉटेलवर छापा टाकला. 

हे ही वाचा: 'या' 5 भाग्यवान राशींच्या लोकांच्या जीवनात लक्षणीय बदल... शुक्र आणि शनिच्या युतीमुळे संपत्तीत वाढ!

नोकरी आणि पैशांचं आमिष दाखवून अडकवलं 

पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली की, राहुल शर्मा, अंकित चौहान आणि सुनील या आरोपींना अटक करण्यात आली आहे. राहुल शर्मा हा हॉटेल मॅनेजर असून या सेक्स रॅकेटचा टोळीचा तो प्रमुख असल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित आरोपींकडून गांजा आणि इतर गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आलं आहे. वृत्तानुसार, नोकरी आणि पैशाचं आमिष दाखवून महिलांना या व्यवसायात ओढण्यात आल्याचं चौकशीत उघड झालं. पोलिसांनी आता अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. 

हे ही वाचा: पुणे : शेअर बाजारातून मोठा परतावा मिळवून देण्याचं आमिष, ज्येष्ठ नागरिकाला 22 कोटींना लुबाडलं

छाप्यादरम्यान, पोलिसांनी हॉटेलच्या वेगवेगळ्या खोल्यांची झडती घेतली. त्यावेळी पोलिसांनी हॉटेलच्या खोल्यांमधून एकूण 11 महिलांना ताब्यात घेतले. सुरुवातीच्या चौकशीत या महिलांनी सांगितलं की त्यांना बराच काळ हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. आता, त्यांना कोणत्या परिस्थितीत तेथे आणण्यात आलं? हे जाणून घेण्यासाठी पोलिस आता या महिलांच्या पार्श्वभूमीचा तपास करत आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp