संतापजनक, 14 वर्षीय मुलीसोबत बाप अन् चुलत भावासह मामाने सलग 4 वर्ष..., तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल!

मुंबई तक

Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, 14 वर्षीय पीडित मुलीवर तिच्या वडिलांनी आणि चुलत भावाने लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांव्यतिरिक्त आणखी दोन व्यक्तींनी वेगवेगळ्या वेळी मुलीवर अत्याचार केले असून, ते सध्या फरार आहेत. पोलिसांनी आरोपींविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत, कारण लैंगिक शोषणाच्या घटना वेगवेगळ्या तारखांना घडल्या होत्या. फरार असलेल्या इतर दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

संतापजनक, 14 वर्षीय मुलीसोबत बाप अन् चुलत भावासह मामाने सलग 4 वर्ष...,

point

तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल!

Crime News ,अलप्पुझा, केरळ: केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी अनेक वर्षांपासून लैंगिक अत्याचार केले. या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. विशेष म्हणजे, हा धक्कादायक प्रकार अनेक वर्षांपासून सुरू होता आणि कोणालाही त्याची कल्पना नव्हती. अखेर, पीडित मुलीने आपल्या एका मैत्रिणीला याबद्दल सांगितल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुलीचे वडील आणि चुलत भाऊ यांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 14 वर्षीय पीडित मुलीवर तिच्या वडिलांनी आणि चुलत भावाने लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांव्यतिरिक्त आणखी दोन व्यक्तींनी वेगवेगळ्या वेळी मुलीवर अत्याचार केले असून, ते सध्या फरार आहेत. पोलिसांनी आरोपींविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत, कारण लैंगिक शोषणाच्या घटना वेगवेगळ्या तारखांना घडल्या होत्या. फरार असलेल्या इतर दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचा : चंद्रपूर : तरुणीचे बॉयफ्रेंडशी प्रेमसंबंध अन् लग्न दुसऱ्याशी, प्रियकराने नवऱ्याला 'ते' फोटो पाठवले, नंतर कपडे काढून मारलं

पोलिसांनी सांगितले की, अलप्पुझा जिल्ह्यातील पुन्नप्रा परिसरात गेल्या चार वर्षांपासून अधिक काळ हे लैंगिक शोषणाचे प्रकार सुरू होते. या घटनेने समाजातील नैतिक मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे, कारण ज्या नात्यांवर विश्वास ठेवला जातो, त्याच नात्यांनी मुलीचा विश्वासघात केला. या घटनेचा तपास करताना पोलिसांना आणखी एक धक्कादायक माहिती मिळाली. पीडित मुलीवर आठ वर्षांची असताना तिच्या मामाकडूनही लैंगिक अत्याचार झाले होते. त्यावेळी मामाला अटक करण्यात आली होती, परंतु जामिनावर सुटल्यानंतर त्याने आत्महत्या केली. या घटनेनंतर मुलीला बाल कल्याण समितीद्वारे चालवल्या जाणाऱ्या एका गृहात ठेवण्यात आले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp