मुंबई : मॅट्रोमोनियल वेबसाईटवर मुलीनं लग्न केलं, नवरा निघाला 4 मुलांचा बाप

मुंबई तक

Mumbai News : मुंबईतील अंधेरीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला, विवाहाची मागणी करणारी 33 वर्षीय महिला एका मॅट्रोमोनियल वेबसाईटवर फसवणुकीला बळी पडली आहे. चार मुलांचा बाप आपण अविवाहित असल्याचे सांगून त्याने संबंधित तरुणीशी विवाह केला. नंतर तो पुरुष हा चार मुलींचा बाप असल्याचे उघड झाले.

ADVERTISEMENT

Mumbai News
Mumbai News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील अंधेरीत धक्कादायक प्रकार उघडकीस

point

मॅट्रोमोनियल वेबसाईटवर चार मुलांच्या बापाने केला विवाह

Mumbai News : मुंबईतील अंधेरीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका 33 वर्षीय महिला मॅट्रोमोनियल वेबसाईटवर फसवणुकीला बळी पडली आहे. चार मुलांचा बाप आपण अविवाहित असल्याचे सांगून त्याने संबंधित तरुणीशी विवाह केला. नंतर तो पुरुष हा चार मुलींचा बाप असल्याचे उघड झाले. पीडितेनं फसवलेल्या शब्बीर शेख उर्फ समीर आणि त्याचा भाऊ शाकीर शेख यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपी सध्या फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : पुतण्यासोबत लपून व्हॅलेंटाईन्स डे साजरा करत होती, नवऱ्याने पकडलं अन्..., सबंध गाव हादरलं!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला अंधेरीत एका रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. 2024 मध्ये घटस्फोटानंतर, तिने पुनर्विवाह करण्यासाठी एका मेट्रिमोनियल वेबसाइटवर प्रोफाइल तयार केले. आरोपीने तिच्याशी संपर्क साधला असता, त्याने आपण स्वत: बिझनेसमन असल्याचा दावा केला, तसेच त्याची पत्नी आणि आई वडिलांचे निधन झाले. दरम्यान डिसेंबर 2024 मध्ये दोघेही जोगेश्वरी येथे एका लग्नात भेटले होते. 

जोडप्याने जय जयवंती सोसायटीत केला विवाह

एफआरआयनुसार, जोडप्याने 30 सप्टेंबर 2025 रोजी कुर्ला (पूर्व) येथील जय जयवंती सोसायटीत विवाह केला होता. या लग्नसमारंभात आरोपीचा भाऊ आणि मेहुणी त्या ठिकाणी उपस्थित होते. लग्नाच्या काहीच दिवसांत त्याने आपले आई वडील जिवंत आहेत आणि त्यांना हा विवाह मान्य नाही, असं सांगितलं.  

आरोपीला पहिल्या बायकोपासून चार मुलं

नंतर जेव्हा महिलेला जोगेश्वरी येथील तिच्या सासरच्या घरी नेलं तेव्हा आढळून आलं की, आरोपी हा आधीच विवाहित होता आणि त्याला त्याच्या पहिल्या बायकोपासून चार मुलं देखील आहेत. पीडितेनं सांगितलं की, संबंधित आरोपीने नकळत मोबाईलचा पासवर्ड मिळवून काही कर्जाशी संबंधित अॅप डाऊनलोड करून 1.77 लाखांचे तिच्या नावावर कर्ज काढण्यात आले. नंतर संबंधित रक्कम आरोपीने भावाच्या खात्यात पाठवली. तसेच व्यवसायात तोटा झाल्याचे कारण सांगत त्याने 1.45 लाख रुपये ही रक्कम देखील घेतली.

हे वाचलं का?

    follow whatsapp