पंधरा दिवसात पोटची दोन्ही मुलं मारली; उंदीर मारण्याचं औषध पाजून संपवलं, प्रियकरासोबत मिळून आईने 'असा' रचला कट
Crime News : आपल्या अनैतिक प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरत असलेल्या पोटच्या दोन चिमुरड्यांची एका आईने विष देऊन हत्या केली. ज्या आईच्या कुशीत मुले स्वतःला सुरक्षित समजतात, त्याच आईने प्रियकरासोबत राहण्यासाठी आपल्या 12 वर्षांच्या मुलीचा आणि 7 वर्षांच्या मुलाचा बळी घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. पंजाबच्या भटिंडामधील ही घटना आहे. एकाच घरातील दोन मुलं 15 दिवसांच्या आत मृत्यू झाल्याने गावकऱ्यांना संशय आला आणि त्यानंतर पुढं जे घडलं त्यामुळे माणसाच्या क्रूरतेचा एक चेहरा सर्वांसमोर आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पंधरा दिवसात पोटची दोन्ही मुलं मारली
उंदीर मारण्याचं औषध पाजून संपवलं
प्रियकरासोबत मिळून आईन रचला कट
Crime News : आपल्या अनैतिक प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरत असलेल्या पोटच्या दोन चिमुरड्यांची एका आईने विष देऊन हत्या केली. ज्या आईच्या कुशीत मुले स्वतःला सुरक्षित समजतात, त्याच आईने प्रियकरासोबत राहण्यासाठी आपल्या 12 वर्षांच्या मुलीचा आणि 7 वर्षांच्या मुलाचा बळी घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. पंजाबच्या भटिंडामधील ही घटना आहे. एकाच घरातील दोन मुलं 15 दिवसांच्या आत मृत्यू झाल्याने गावकऱ्यांना संशय आला आणि त्यानंतर पुढं जे घडलं त्यामुळे माणसाच्या क्रूरतेचा एक चेहरा सर्वांसमोर आला.
हे ही वाचा : मुंबई : मॅट्रोमोनियल वेबसाईटवर लग्नासाठी निवडलेला नवरा निघाला 4 मुलांचा बाप, 'एवढी' रक्कम लुटून झाला पसार
गावकऱ्यांचा संशय बळावला
एकाच कुटुंबातील दोन मुलांचा अवघ्या 15 दिवसांच्या अंतराने मृत्यू झाल्याने गावकऱ्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. मिळालेल्या माहितीनुसार, 15 दिवसांपूर्वी या महिलेच्या 12 वर्षांच्या मुलीचा अचानक मृत्यू झाला होता. त्यावेळी तिला एखादा आजार झाला असावा, असे समजून कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी कोणतीही पोलीस तक्रार न करता अंत्यसंस्कार केले. मात्र, शुक्रवारी रात्री 7 वर्षांच्या फतेहवीर या लहान मुलाचाही तशाच परिस्थितीत मृत्यू झाल्याने गावकऱ्यांचा संशय बळावला.