ट्रान्सजेंडर अवंतिकाच्या प्रेमापोटी मित्राने मित्राचा काटा काढला, नंतर मृतदेह आंब्याच्या बागेत पुरला
crime news : ट्रान्सजेंडर अवंतिकाच्या प्रेमापोटी आपल्या मित्राची हत्या केली, नेमकं काय घडलं जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ट्रन्सजेंडरने दीपकसोबत मिळून साक्षरचा काटा काढला
विटांसह काठ्यांनी साक्षरवर हल्ला
Crime news : बुलंदशहर कोतवाली भागात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आरोपी शाम साक्षरच्या मोबाईल फोनवर मित्र दीपकचा फोन आला होता. सिकंदराबादमधील अंब्याच्या बागेत आयोजित करण्यात आलेल्या पार्टीसाठी त्याला बोलावले, नंतर साक्षरसोबत एक भयानक घटना घडल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा : आईने मुलाचा जीव वाचवण्यासाठी मुलीचा घेतला बळी, जादूटोणा आणि अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार उघडकीस
ट्रन्सजेंडरने दीपकसोबत मिळून साक्षरचा काटा काढला
पोलीसांच्या तपासा दरम्यान, समोर आलेलं सत्य परिस्थिती पाहून सर्वांच्याच अंगावर काटा आला. या खूनी कटाच्या केंद्रस्थानी अमन होती, अवंतिका ट्रान्सजेंडर अशी तिची ओळख होती. साक्षर, दीपक आणि देवेश हे अवंतिकाच्या प्रेमात वेडे झाले होते. पण, अवंतिकाला साक्षरपासून सुटका हवी होती. संबंधित प्रकरणात असा आरोप की, अवंतिकाने दीपकसोबत मिळून साक्षरचा काटा काढण्याचा प्लान आखला.
आंब्याच्या बागेत खोल खड्डा खणून साक्षरचा मृतदेह पुरला
आंब्याच्या बागेत दारू पिण्यासाठी मैफल रंगली होती, त्याचदरम्यान वाद घडला. साक्षरच्या मित्रांनी त्याच्यावर हल्ला केला. मृत्यू होईपर्यंत त्याला विटांसह काठ्यांनी मारहाण केली. हत्येनंतर, आपली ओळख लपवण्यासाठी आरोपीने बागेत खोल खड्डा खणून साक्षरचा मृतदेह पुरला.
हे ही वाचा : हनुमान जयंती दिवशी 'या' राशीतील लोकांवर बजरंगबलीचा आशीर्वाद राहणार
संबंधित प्रकरणात अतिरिक्त पोलीस शंकर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेला आरोपी देवेशच्या ठिकाणाहून आरोपीचा डोकं ठेचलेला छिन्नविछन्न मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी पीडिताचे पाकीट, आधारकार्ड तसेच रक्ताने माखलेली वीट जप्त केली. तसेच अवंतिका, देवेश आणि शुभम तुरुंगात असून, मुख्य सूत्रधार दीपक फरार झाला आहे. पोलिसांनी संशयास्थळी धाव घेत पुढील तपास सुरु ठेवला.









