LPG बुक केला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला Army Officer, पत्नीसोबत केलेलं नको ते!
गेल्या सहा वर्षांपासून फरार असलेला एका फौजीला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गॅस सिलिंडर बुकिंगमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. 2013 साली त्याने आपल्या बायकोची हत्या केली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
LPG बुक केला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला Army Officer
पत्नीसोबत केलेलं नको ते!
Crime News : एलपीजी सिलिंडरच्या एका साध्या बुकिंगमुळे एक फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. गेल्या सहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या भारतीय सैन्यातील एका माजी कॅप्टनला अखेर गजाआड करण्यात आले आहे. पत्नीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची सजा भोगत असलेला संदीप तोमर हा 2020 पासून फरार होता. मात्र, मध्य प्रदेशातील पांढुर्णा जिल्ह्यातून त्याला पंजाब पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. सोमवारी त्याला फाजिल्का न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
2013 मध्ये केली बायकोची हत्या
संदीप तोमर 2013 मध्ये पंजाबमधील अबोहर येथे तैनात असताना त्याने आपली पत्नी श्वेता सिंह हिची हत्या केली होती. सुरुवातीला त्याने ही घटना आत्महत्येचा प्रकार असल्याचे भासवले होते, परंतु सखोल तपासानंतर हा पूर्वनियोजित हत्येचा कट असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी 2014 मध्ये ट्रायल कोर्टाने त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पुढे 2022 मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने देखील त्याची ही जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली होती.
हे ही वाचा : अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या अडचणीत वाढ, मावळमधील शेतकऱ्याची थेट न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय?
ओळख बदलून पोलिसांना चकवा
शिक्षा सुनावल्यानंतर 2019 मध्ये संदीपला जामीन मिळाला होता, मात्र 2022 मध्ये उच्च न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यानंतर त्याने न्यायालयात शरणागती पत्करली नाही. तेव्हापासून तो आपली ओळख आणि ठिकाण बदलून पोलिसांना चकवा देत होता. 2024 मध्ये मृत श्वेता सिंह यांच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्याच्या अटकेची मागणी केली. यावर न्यायालयाने पंजाबच्या पोलीस महासंचालकांना 8 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर फाजिल्का एसएसपींनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले.
हे ही वाचा : नांदेडमधील 'तलवार बाबा'ला पोलिसांनी उचललं, महिला अन् लहान मुलांना कसं गंडवायचा? कारनामे उघड
गॅस रिफिल केल्यामुळे सापडला
तपासादरम्यान फाजिल्का पोलिसांनी संदीप तोमरच्या पॅन कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्याचा मागोवा घेतला. याच खात्यातून त्याने एलपीजी सिलिंडरचे पेमेंट केल्याचे समोर आले. बँक स्टेटमेंटवरून तो मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथील एका गॅस एजन्सीकडून सिलिंडर रिफिल करत असल्याचे समजले. पोलिसांनी तात्काळ त्या एजन्सीकडून त्याचा पत्ता मिळवला आणि पांढुर्णा पोलिसांच्या मदतीने सापळा रचून त्याला अटक केली. एका डिजिटल व्यवहारामुळे हा अट्टल गुन्हेगार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.









