पुण्याची गोष्ट : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपलं, रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरुप, नागरिकांची उडाली दाणादण

मुंबई तक

Pune News : उन्हाळा ऋतू सुरु असूनही सध्या राज्यभरातील काही भागांत अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. ज्यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्राचा समावेश होतो. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर म्हणून पुण्याची ओळख आले. आज 4 मार्च 2026 रोजी काही तास याच पुणे शहाराला अवकाळी पावसाने झोडपलं आहे. याचा फटका पुणेकरांना बसणार आहे.  

ADVERTISEMENT

pune news
pune news
google news

बातम्या हायलाइट

point

खडकवासला भागात काही तासांपासून अवकाळी पाऊस 

point

बारामतीत अवकाळी पावसाचा फटका

पुण्याची गोष्ट : उन्हाळा ऋतू सुरु असूनही सध्या राज्यभरातील काही भागांत अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. ज्यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्राचा समावेश होतो. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर म्हणून पुण्याची ओळख आले. आज 4 मार्च 2026 रोजी काही तास याच पुणे शहाराला अवकाळी पावसाने झोडपलं आहे. याचा फटका पुणेकरांना बसणार आहे.  

हे ही वाचा : अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या अडचणीत वाढ, मावळमधील शेतकऱ्याची थेट न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय?

खडकवासला भागात काही तासांपासून अवकाळी पाऊस 

बदलत्या हवामानाचा वातावरणावर मोठा बदल होताना दिसतो. रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरुप प्राप्त झाल्याचं चित्र आहे. या अवकाळी पावसाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खडकवासला भागात गेली काही मुसळधार पावसाने धिंगाणा घातल्याचं सांगण्यात येत आहे.

खडकवासला भागातील रस्त्यांना नाल्याचे स्वरुप आले असून गेली काही तास वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. लोक देखील पाण्यातून वाट काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पुण्यातील विविध भागातून अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत लोक पाण्यातून वाट काढू लागले आहेत. खडकवासला, वारजे, माळवाडी या अवकाळी पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : ट्रान्सजेंडर अवंतिकाच्या प्रेमापोटी मित्राने मित्राचा काटा काढला, नंतर मृतदेह आंब्याच्या बागेत पुरला

बारामतीत अवकाळी पावसाचा फटका

अशातच बारामीमधील ग्रामीण भागातही काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशातच आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी बारामती मधील पणदरे गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या केळी आणि इतर पिकांची पाहणी केलीय. अवकाळी पावसाने ग्रामीण शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं असून सरकारने त्यांना त्वरित मदत करावी अशी मागणी केली. 
 

हे वाचलं का?